*गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंगळवेढा पोलिसांचे पथसंचलन*
मंगळवेढा(प्रतिनिधी):-
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंगळवेढ्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलिस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवेढा शहरातून पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथसंचलन करण्यात आले.
मंगळवेढा पोलीस स्टेशन येथून सुरुवात होऊन दामाजी चौक, शिवप्रेमी चौक,चोखामेळा चौक,मुरलीधर चौक गल्ली, शिवाजी तालीम ते शनिवार पेठ या मार्गावर पथ
संचलन करून पुन्हा मंगळवेढा पोलीस स्टेशन येथे समारोप करण्यात आला.
संचलन करून पुन्हा मंगळवेढा पोलीस स्टेशन येथे समारोप करण्यात आला.
यावेळी पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे ,सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक,सहाय्यक फौजदार,पोलीस नाईक, पोलीस शिपाई चालक तसेच होमगार्ड आदी सहभागी झाले होते.