मंगळवेढा(प्रतिनिधी):-
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली दीड ते दोन वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्रात बंद असलेली मंदिरे उघडण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात शंखनाद आंदोलन करण्यात आले त्याच प्रसंगी त्या पार्श्वभूमीवर पंढरपूर येथे आमदार समाधान दादा आवताडे यांच्या नेतृत्वाखाली श्री.विठ्ठल रुक्मिणी मंदिर उघडण्यासाठी आज नामदेव पायरी जवळ भारतीय जनता पक्षातर्फे शंखनाद आंदोलन करण्यात आले. महा आघाडी सरकार विरोधात घोषणा देऊन सरकारचा निषेध करण्यात आला मोर्चामध्ये मंदिर उघडण्यास घोषणा करण्यात आल्या लवकरात लवकर सर्व मंदिरे उघडण्याचा निर्णय सरकारने घेण्यात यावा नाहीतर यापुढील आंदोलन हे उग्र करण्यात येईल असे भारतीय जनता पार्टीचे व पंढरपूर मंगळवेढा चे लोकप्रिय जनतेचे आमदार समाधान दादा आवताडे यांनी बोलताना सांगितले. त्याचबरोबर भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दादा देशमुख यांनी कार्यकर्त्यांसमवेत मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केला.
यावेळी युवा नेते प्रणव परिचारक प्रदेश सहसंयोजक महिला आघाडी अनुराधाताई सरवदे, युवा मोर्चा अध्यक्ष व नगरसेवक विक्रम शिरसाट, तालुकाध्यक्ष भास्कर कसगावडे, माऊली हळणवर, जिल्हा सरचिटणीस बादल सिंह ठाकूर, युवा मोर्चा शहराध्यक्ष लाला पानकर, भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सुनील काका भोसले, तुकाराम आबा कुरे,विनोद लटके,भैय्यासाहेब कळसे, प्रसाद दादा सातपुते, आबासाहेब पाटील, रुपेश आंबूरे, अमोल धोत्रे, चंद्रकांत क्षीरसागर, शहाजी शिंदे, दादा घायाळ,युवा नेत्या डॉक्टर सौ वैशाली पाटील,सोलापूर जिल्हा महिला अध्यक्ष सौ धनश्री खटके पाटील सोलापूर जिल्हा अध्यक्ष भटक्या विमुक्त जाती जमाती माया माने जिल्हा सचिव वंदना शहराध्यक्ष सुरेखा व्यवहारे सोलापूर जिल्हा सरचिटणीस सविता कस्तुरे जिल्हा उपाध्यक्ष कल्पना शिंदे शहराध्यक्ष अपर्णा तारखे तालुकाध्यक्ष स्मिता पाटील, तालुका उपाध्यक्ष शितल खटावकर आदीजन उपस्थित होते.