शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी डॉ.शरद शिर्के यांचेकडून 51 हजारांची देणगी

शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी डॉ.शरद शिर्के यांचेकडून 51 हजारांची देणगी

मंगळवेढा ( प्रतिनिधी):-

            मंगळवेढा शहरात महापुरुषांच्या पुतळ्यांची उभारणी लोकवर्गणीतून करण्यात येणार असून त्यासाठी डॉ.शरद शिर्के व डॉ.प्रीती शिर्के यांनी 51 हजारांची देणगी दिली आहे. मंगळवेढा शहरातील विविध पक्षाचे पदाधिकारी, विविध सामाजिक संघटना , सर्व सार्वजनिक उत्सव मंडळे यांच्या प्रयत्नाने मंगळवेढ्यात महापुरुषांच्या पुतळ्यांची उभारणी लोकवर्गणीतून करण्यात येणार असून शिर्के हॉस्पिटलचे संस्थापक डॉ.शरद शिर्के व डॉ.प्रीती शिर्के  यांचेकडून मंगळवेढ्यात शहरातील शिवप्रेमी चौकातील छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी 51 हजारांची रूपयांचा निधी समितीकडे देण्यात आला.

           याप्रसंगी पक्षनेते अजित जगताप,नगरसेवक राहुल सावंजी, संभाजी घुले, हर्षद डोरले, नागेश भगरे आदी उपस्थित होते. 

            दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासूनची शिवरायांच्या पुतळ्याची मागणी लवकरच पूर्णत्वास येणार असून डॉ.शरद शिर्के यांच्या या दातृत्वामुळे पुतळा बसवण्याचे काम आणखी वेगात सुरू होण्यास मदत होणार आहे. सदर पुतळे करण्याचे काम पुण्यातील सुप्रसिद्ध मूर्तिकार महेंद्र धोकटे यांना दिले आहे.

                छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे प्रेरणास्थान असून मंगळवेढा शहरात महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा राहणार असून शहराच्या वैभवात भर पडणार आहे.सर्वांनी मदत करून महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा करण्यास हातभार लावण्याचे आवाहन डॉ.शरद शिर्के यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.