मंगळवेढ्याच्या ज्वारीची ओळख होणार देशभर; पोस्ट विभागामार्फत ‘मंगळवेढा ज्वारी’ हे स्पेशल कव्हर प्रसिद्ध

मंगळवेढ्याच्या ज्वारीची ओळख होणार देशभर; पोस्ट विभागामार्फत ‘मंगळवेढा ज्वारी’ हे स्पेशल कव्हर प्रसिद्ध


मंगळवेढा(प्रतिनिधी):-

             भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल अंतर्गत येणाऱ्या, पुणे क्षेत्रीय कार्यालय यांचे मार्फत “मंगळवेढा ज्वारी” वर एक विशेष कव्हर श्रीमती जी. मधुमिता दास, पोस्टमास्तर जनरल पुणे क्षेत्र , पुणे यांच्या हस्ते जारी करण्यात आले.

           सदर कार्यक्रमासाठी श्रीमती जी. मधुमिता दास, पोस्टमास्तर जनरल पुणे क्षेत्र, पुणे, अर्जुनसिंह पाटील सहाय्यक आयुक्त, सोलापूर , मदन मुकणे प्रकल्प संचालक, आत्मा ( ATMA), सोलापूर ,सौ.मंगल श्रीरंग काटे सचिव, मालदांडी ज्वारी विकास संघ, मंगळवेढा ,पंढरपूर आणि मंगळवेढा येथील इतर सन्मानित पाहुणे तसेच डाक विभागाचे उच्च पदस्थ अधिकारी व नामांकित व्यक्ती उपस्थित होत्या.

           कार्यक्रमाची सुरुवात पंढरपूर विभागाचे डाक अधीक्षक पी. ई. भोसले यांनी प्रास्ताविकाने केली. उपस्थित मान्यवरांच्या स्वागतानंतर दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.अर्जुन सिंह पाटील सहाय्यक आयुक्त, सोलापूर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सर्वसामान्यांच्या दैनंदिन आहारातील ज्वारीचे महत्व विषद केले आणि टपाल विभागाचे सदर विशेष अवरणासंदर्भात समाधान व्यक्त केले.


         श्री.मुकणे यांनी मंगळवेढा ज्वारीचे वैशिष्ट्ये सांगताना मंगळवेढ्याच्या मृदा वैशिष्ट्यांमुळे ज्वारी मध्ये असलेल्या विशिष्ट गुणधर्माबाबत आणि मालदांडी या ज्वारीच्या नैसर्गिक वाणा बाबत सविस्तर माहिती देऊन आत्मा ( ATMA), सोलापूरकडून राबविण्यात येणाऱ्या शेतकरी हिताच्या विविध योजनांची माहिती उपस्थितांना दिली.
 
          सौ .मंगल श्रीरंग काटे सचिव, मालदांडी ज्वारी विकास संघ ,मंगळवेढा यांनी मालदांडी ज्वारीस महाराष्ट्र राज्याकडून भौगोलिक मानांकन ( G.I.)मिळवण्यासाठी केलेल्या कार्याबाबत माहिती सांगितली.भारतीय डाक विभागाच्या पुणे क्षेत्र कार्यालयाच्या माननीय पोस्टमास्तर जनरल श्रीमती. जी मधुमिता दास (भारतीय डाक सेवा ) यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये भारतीय डाक विभागाचे कोरोना संक्रमण काळातही कार्य अविरत चालू असल्याचे आवर्जून नमूद केले.

       पुढे बोलताना त्या म्हणाल्या की कोरोना काळामध्ये डाक विभागातील कर्मचारी वर्गाने कोरोना नियमांचे पालन करून १८ हजार कोटी रुपयांचे विविध योजनांचे अनुदान लाभार्थ्यांना घरपोच वितरित केले आहे.

         याबरोबर डाक विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध बचत योजना, विमा सेवा, आधार सेवा, पासपोर्ट सेवा, आय. पी.पी. बी. सेवा सह इतर सर्व योजनाचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.
सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मंगळवेढा डाक उपविभागाचे निरीक्षक हनुमंत चव्हाण व सूत्रसंचालन सहाय्यक पोस्ट मास्तर सोमनाथ गायकवाड यांनी केले.

              राष्ट्रगीताने सदर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आर. बी. घायाळ. सहा. अधिक्षक उत्तर विभाग , नागेश डुकरे डाक निरीक्षक, करमाळा , सचिन इमडे तक्रार निवारण अधिकारी पंढरपुर प्रशांत काटे,विक्रम सावंजी कृषी विभाग मंगळवेढा यांनी विशेष परिश्रम केले.

            मंगळवेढा ज्वारी ही मंगळवेढा तालुक्यातील एक चांगल्या प्रकारे पिकणारे पिक आहे. येथील शेतकरी गेली अनेक वर्षे मोठ्या आकाराच्या पांढऱ्या मोत्यांचे अर्थात ज्वारीचे उत्पादन करीत आहेत.

             या ज्वारीस मालदांडी ज्वारी असेही संबोधले जाते. येथील ज्वारीमध्ये ग्लुकोजची मात्रा अधिक असल्याने ती गोड आहे. इतर धान्याच्या तुलनेत ज्वारी मध्ये कार्बोहायड्रेट ,कॅल्शियम ,प्रोटीन ,व्हिटॅमिन ,खनिज पदार्थ,पाचक घटक,ऑंटीअक्सिडेंट अधिक असल्याने ते एक उत्तम खाद्य मानले जाते.या ज्वारीस दिनांक ३१ मार्च २०१६ रोजी महाराष्ट्र राज्याकडून भौगोलिक मानांकन प्राप्त झाले आहे.डाक विभागातर्फेम ज्वारीवर विशेष आवरण प्रकाशित करण्यात आल्यामुळे मंगळवेढ्याच्या मालदांडी ज्वारीची ओळख देशभर होण्यास मदत होणार आहे. मंगळवेढा तालुक्यासाठी ही एक अभिमानास्पद व गौरवास्पद बाब आहे.



ढवळस येथील प्रगतशील द्राक्ष बागायतदार मा.नवनाथ सिद्राम हेंबाडे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला,यावेळी डावीकडून रामचंद्र हेंबाडे, सौरभ हेंबाडे, ओंकार हेंबाडे, अमर बावचे, विशाल हेंबाडे,रोहित हेंबाडे, मधुकर हेंबाडे ,बबलू हेंबाडे आदीजन उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.