ढवळस गाव सीसीटीव्ही कक्षेत ठेवण्यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घ्यावा - भगवान बुरसे
ढवळस (सचिन हेंबाडे):-
ढवळस गाव सीसीटीव्ही कक्षेत येण्यासाठी आज ढवळस येथे पोलीस निरीक्षक जोतीराव गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भगवान बुरसे यांनी ग्रामपंचायत कार्यालय मध्ये बैठक घेऊन तालुक्यातील व गावातील वाढत्या चोरी व गुन्हेगारीवर,खोट्या केसेसवर आळा बसविण्यासाठी सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते मॅडम यांच्या आदेशान्वये राबवण्यात येणाऱ्या उपक्रमाची सुरवात करण्याच्या अनुषंगाने ढवळस ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.
संपूर्ण गाव सीसीटीव्हीच्या कक्षेत आणून याठिकाणी उत्तम दर्जाचे कॅमेरे बसवून चोरापासून अलर्ट राहण्यासाठी प्रयत्न करूयात.या सीसीटीव्ही फुटेज मुळे खोट्या केसेस अनोळखी व्यक्तीचा रात्री-बेरात्री गावात होणारा शिरकाव यासह सर्व बाजूने या उपक्रमाचा ढवळस गावाला लाभ होईल, यासाठी रात्री गस्त,सायलेन्सचा आवाज, ग्रामसुरक्षा दल निर्माण करून त्यांना पोलीस प्रशासनाकडून काही साहित्य व योग्य मार्गदर्शन देण्यात येईल,गावातील तंटामुक्त समिती, पोलीस पाटील, ग्रामपंचायत प्रशासन पोलीस गाडीचा सायलेन्स देऊन जागृत राहुयात, या आवाजामुळे काही लोक तरी अलर्ट राहतील.
यावेळी बोलताना सरपंच सिद्धेश्वर मोरे यांनी पोलीस प्रशासनाने सुरू केलेला हा उपक्रम नक्की स्मार्ट ठरलेल्या गावाला फायदेशीर असेल,ढवळस गाव कोरोणाच्या लॉक डाउन काळात अनेक अडचणी आल्या, गावातील लोकांनी कोरोना मुक्त गाव होण्यासाठी सहकार्य केले आहे,जिल्हा परिषद प्रशासनाकडून ग्रामपंचायतीस 15 वित्त आयोगाचा निधी या सीसीटीव्ही फुटेज साठी वापरता आला, तर हा उपक्रम उत्तम पणे राबवता येईल.
या कार्यक्रमास गावचे सरपंच सिद्धेश्वर मोरे,उपसरपंच सिद्धेश्वर महाजन,सदस्या सुदमती मोरे,सदस्या राधिका हेंबाडे,सदस्य गंगाराम बावचे,माजी सरपंच आबासो मोरे,पोलीस पाटील आनंदा रायबान,समाधान बावचे, बालाजी मोरे,महादेव मोरे,अभिषेक मोरे,तुकाराम मोरे, दिगंबर मोरे,पिंटू मोरे,अमर मोरे,गणेश मोरे,सिताराम सुतार ,शरद लोखंडे, मारुती हेंबाडे,जिल्हा परिषद शिक्षक मुख्याध्यापक सूर्यकांत जाधव ,सुदर्शन शेजाळ यांच्यासह ग्रामसुरक्षा दल ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होता.