डोणज येथील पाणीपुरवठा योजनेसाठी ५६ लाख रुपयांचा निधी मंजूर -आ.समाधान आवताडे


डोणज येथील पाणीपुरवठा योजनेसाठी ५६ लाख रुपयांचा निधी मंजूर -आ.समाधान आवताडे          


          मंगळवेढा (प्रतिनिधी):- महाराष्ट्र राज्य जल जीवन मिशन योजनेअंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील डोणज येथील पाणीपुरवठा योजनेसाठी अधीक्षक अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळ सांगली यांनी ५६ लाखांच्या निधीसाठी तत्त्वतः मंजुरी दिली असल्याची माहिती आ.समाधान आवताडे यांनी दिली.

            सदर योजनेतील उपलब्ध झालेल्या निधीतून पाणीपुरवठा विहीर पाईप लाईन माध्यमातून उंच पाण्याची टाकी उभा करून त्या अंतर्गत घरोघरी नळ पुरवठा सुविधा करून देणे अशा स्वरूपाची कामे केली जाणार आहेत. सदर पाणीपुरवठा मंजुर व्हावी यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी रेटा लावला होता. जनतेची ही मागणी लक्षात घेऊन आमदार समाधान आवताडे यांनी विशेष प्रयत्न करून सदर योजनेस निधी मिळवून दिला आहे.
           
          यासाठी जि.प.उपाध्यक्ष दिलीप चव्हाण, जिल्हा परिषद समाजकल्याण समिती माजी सभापती शिला शिवशरण, जि.प.सदस्या मंजुळा कोळेकर,पंचायत समिती सभापती प्रेरणा मासाळ, उपसभापती सुर्यकांत ढोणे, माजी सभापती प्रदीप खांडेकर, माजी उपसभापती विमल पाटील, पंचायत समिती सदस्य उज्वला मस्के,दामाजी शुगर चे संचालक अशोक केदार, सरपंच किर्ती अशोक केदार,उपसरपंच सदाशिव तायाप्पा कोळी, ग्रामसेवक  एन. बी.पाटील आदींनी पाठपुरावा केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.