मंगळवेढा नगरपरिषदेवर भाजप करणार धरणे आंदोलन- सुशांत हजारे

मंगळवेढा (प्रतिनिधी):-

      मंगळवेढा नगरपरिषदेच्या विविध समस्या बाबत सोमवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी भारतीय जनता पक्षाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येणार आहे . 

        मंगळवेढा शहरामधील सध्या विकासकामांच्या माध्यमातून नागरिकांना समस्या निर्माण करणारे काम चालू आहे , तसेच सध्या शहरामध्ये विविध समस्या देखील दिसून येत आहेत . वारंवार सांगून देखील बऱ्याच समस्यांना तोंड द्यावे लागत आहे . 
                या सर्व विषयावर भारतीय जनता पार्टी सोमवारी नगरपालिका आवारात धरणे आंदोलन करणार आहे. असे भारतीय जनता युवा मोर्चा शहराध्यक्ष सुशांत हजारे यांनी सांगितले. या संदर्भात पोलीस निरीक्षक जोतीराम गुंजवटे यांना निवेदन दिले. यावेळी सुजित निकम,बबलू सुतार,अजित लेंडवे,पांडुरंग दिवसे,अविनाश मेटकरी,ओंकार भुसे आदी उपस्थिती होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.