संत दामाजीनगर जिल्हा परिषद गटातून सदस्य पदासाठी समाजसेवक माजी सरपंच रामचंद्र सलगर यांचे नाव "या"कारणामुळे आघाडीवर

संत दामाजीनगर जिल्हा परिषद गटातून सदस्य पदासाठी समाजसेवक माजी सरपंच रामचंद्र सलगर यांचे नाव "या"कारणामुळे आघाडीवर 


मंगळवेढा / सचिन हेंबाडे :- 

 जिल्हा परिषद निवडणूक मंगळवेढा संत दामाजीनगर गटासाठी धर्मगावचे माजी सरपंच रामचंद्र नागनाथ सलगर हे संत दामाजी नगर गट या मतदार संघातून सदस्य पदासाठी इच्छुक उमेदवार आहे. एक समर्थ व सशक्त पर्याय आपल्या भागातून जिल्हा परिषद सभागृहात पोहोचावा या हेतूने मी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. एका सर्व सामान्य शेतकरी कुटुंबातून समाजकरणाचा वसा हाती घेतल्याचा मला सार्थ अभिमान आहे.
गेली २५ वर्ष गांव पातळीवर मी सामाजिक विकासासाठी ८०% समाजकारण व २०% राजकारण ह्या ध्येय धोरणानुसार सामाजिक कार्य करित आहे.ह्याच ध्येय धोरणामुळे व गावकऱ्यांच्या सहकार्यामळे माझी पत्नी सरपंच व मी उपसरपंच म्हणून गावाची विकास कामे योग्य रित्या पार पाडली आहेत. त्याच कामाची पोहोच पावती म्हणून चालू पंच वार्षिकला माझी भावजय सरपंच व भाऊ ग्रामपंचायत सदस्य म्हणून गावची विकास कामे योग्य रित्या मार्गी लावत आहे.
गेली अनेक वर्षापासून मी सार्वजनिक व धार्मिक कार्यक्रम, महापुरुषांचे जयंती उत्सव, स्मशान भूमी बांधकाम, बौद्ध विहार बांधकाम तसेच छोटी मोठी समाज उपयोगी कामे स्वःखर्चातून केली आहे. गावच्या विकास कामांसाठी विशेष प्रयत्न करुन लाखो रुपयांच्या निधी आणला आहे.
 सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आरोग्य शिबीर, वृक्षारोपन व शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप तसेच माझ्या वाढदिवसाचे औचित्य साधून संत दामाजी नगर जिल्हा परिषद गटातील १ जुन रोजी जन्मलेल्या मुलींच्या नावे १०,००० / - रूपयांच्या ठेवी ठेवल्या आहेत. ग्रामीण भागातील अनेक तरुणांना आपण समाजाचे देणे लागतो या सामाजिक भावनेतून त्यांना आर्थिक रित्या सक्षम बनवण्यासाठी शेकडो युवकांना सहकार्य करुन नवउद्योजक घडवून समाजापूढे एक नवा आदर्श घालून दिला आहे.विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम घेतले आहेत.
 योगायोगाने माझा हा संत दामाजी नगर जिल्हा परिषद गट त्या दृष्टीने अतिशय योग्य व संकल्प पुर्तिंस साथ देणारा बळकटी देणारा आहे. महापुरुषांच्या विचाराने प्रेरीत होऊन समाज विकासासाठी ज्ञात केलेली ज्ञान साधना आगामी काळात मी आचारणात आणण्याचा पुरेपुर प्रयत्न करीन. तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य बंधू भगिनींनी माझ्याशी नाते जोडले नाही तर आपण सामाजिक प्रगती करु शकणार नाही याची चिंता वाटते त्यासाठी आपण एकत्र येऊ या. आपल्या संत दामाजी नगर जिल्हा परिषद गटाचे रुप अधिक विकसीत व प्रगतशिल करुन एक नव इतिहास घडवूया अशा प्रकारे परिचय करून देण्यात आला आहे.

रामचंद्र सलगर यांचा तालुक्यातील व ग्रामीण भागातील विकास व समाज उपयोगी कार्यक्रमामुळे जनसंपर्क मोठ्या प्रमाणात वाढला आहे.कोणताही जातीभेद न करता सर्व समाजाला सोबत घेऊन समाजकारण करने , गोरगरिब जनतेच्या मदतीला धावून जाणारे,सामाजिक कार्यक्रमांना सढळ हाताने मदत करणारे एक आदर्श दानशूर व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
संत दामाजीनगर जिल्हा परिषद गटातून इच्छुक उमेदवार म्हणून रामचंद्र सलगर यांनी निवडणूक जाहीर होण्या अगोदर संत दामाजीनगर गटातील संत दामाजीनगर,ढवळस, धर्मगाव , मुढवी,उचेठाण, बठाण, ब्रम्हपुरी,माचणूर, तामदर्डी,बोराळे, तांडोर,सिद्धापूर,अरळी, नंदूर,डोणज, मुंढेवाडी, रहाटेवाडी या गावांमध्ये भेटीगाटी घेऊन स्थानिक नागरिकांच्या मूलभूत अडी-अडचणी समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

सलगर यांनी संत दामाजीनगर गटातून आपण निवडून आल्यानंतर विकास कसा करायचा व विकास काय असतो तो करून दाखवणार असल्याचे संत दामाजीनगर जिल्हा परिषद भावी सदस्य रामचंद्र सलगर यांनी निश्चय केला आहे.

या वरील कामाच्या जोरावर दामाजीनगर गटातून वरील सर्व गावातून रामचंद्र सलगर यांना जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत आहे व उमेदवार रामचंद्र सलगर यांच्या नावाला जनतेची पसंती मोठ्या प्रमाणात वाढत आहे.यामुळे रामचंद्र सलगर हे संत दामाजीनगर गटातून निवडणूक लढवण्यावर ठाम असून भाजप आमदार समाधान आवताडे यांच्या भारतीय जनता पार्टी यांच्याकडून संत दामाजीनगर जिल्हा परिषद गटात निवडणूक लढवण्यासाठी संधी देण्यात यावी अशी संत दामाजीनगर गटातील जनतेची मागणी आहे.जिल्हा परिषद संत दामाजीनगर गटातून सदस्य पदासाठी रामचंद्र सलगर याचे नाव आघाडीवर आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.