मंगळवेढा नगरपरिषद निवडणूकपहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज नाही दाखल.नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यासाठी एकूण ८ टेबल व ८० कर्मचारी.

मंगळवेढा नगरपरिषद निवडणूक
पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज नाही दाखल.

नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यासाठी एकूण ८ टेबल व ८० कर्मचारी.

मंगळवेढा /प्रतिनिधी :- 

 मंगळवेढा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र भरण्यास दि.१० नोव्हंबर पासून सुरूवात झाली असून पहिल्या दिवशी मंगळवेढा नगरपरिषद साठी एकही अर्ज दाखल झाला नसल्याचे निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले. 

मंगळवेढा नगरपरिषद निवडणुकीसाठी दि.१० नोव्हेबर ते १७ नोव्हेंबरच्या दुपारी ३ वाजेपर्यत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची मुदत आहे. मंगळवेढयात राजकीय पक्षात अद्याप एकमत न झाल्यामूळे पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल होवू न शकल्याचे राजकीय वर्तुळातून बोलले जात आहे. सोमवार हा आठवडातील पहिला दिवस असून मंगळवेढयाचा बाजार असल्याने या दिवशी वाजतगाजत उमेदवारी अर्ज दाखल होतील असे मंगळवेढेकरांना आशा होती मात्र त्या उलट चित्र या पहायला मिळाले येथे नगराध्यक्ष पदासाठी महिलासाठी आरक्षित असल्यामुळे मोठी खर्चीसाठी चढाओढ सुरू आहे. भाजप पक्षाकडून अनेकजण इच्छुक आहेत मात्र पक्ष कोणाला नेमके तिकिट देणार याकडे मतदारांचे लक्ष लागून राहिले आहे.
आत्तापर्यंत मंगळवेढा नगरपरिषदेवर राष्ट्रवादीची सत्ता होती. मध्यंतरी निवडणुका न झाल्यामुळे राजकीय लोकामधील एकसंघता विस्कळीत झाली आहे. परिणामी जुळवाजुळवी करण्यात वेळ जात असल्याचे पहावयास मिळत आहे. मंगळवेढयाचे सत्ताधारी आमदार नगरपरिषद आपल्या ताब्यात ठेवण्यात कितपत यश मिळवतात याकडे ही मतदारांचे लक्ष लागून राहिले आहे.नामनिर्देशन पत्र स्विकारण्यासाठी नगरपरिषदेतील ५५ कर्मचारी तसेच महसूल व अन्य विभागाकडील २५ असे एकूण ८० कर्मचारी निवडणुकीसाठी नेमण्यात आल्याचे सांगण्यात आले. यामध्ये मदत कक्ष, एक खिडकी, नामनिर्देशन पत्र स्विकारणे, अर्ज तपासणी, दोन पथक असे विभाग करण्यात आले आहेत.
 यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी मदन जाधव हे जातीचे या सर्व यंत्रणेवर लक्ष ठेवून आहेत. सहाय्यक निवडणूक अधिकारी मनिषा मगर, अतिरिक्त निवडणूक निर्णय अधिकारी संतोष जाधव, कार्यालयीन अधिक्षक सचिन मिसाळ, निरीक्षक तृप्ती रसाळ, लेखापरिक्षक गिता वडेकर आदि ' कर्मचारी यासाठी परिश्रम घेत आहेत. दरम्यान नामनिर्देशन पत्र सादर करण्यासाठी एकूण ८ टेबल ठेवण्यात आले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.