मंगळवेढा /प्रतिनिधी :-
नवरात्र उत्सव काळाकरिता मंगळवेढा पोलीस स्टेशन येथे आज सोमवार दि. १५ सप्टेंबर रोजी दुपारी ठीक १२:०० वाजता बैठकीचे आयोजन करण्यात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांनी दिली.
यावेळी मंगळवेढा तालूक्यातील व शहरातील सर्व नवरात्र उत्सव मंडळाच्या अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्त्यानी तसेच पोलीस पाटील यांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांनी केले आहे.