मंगळवेढ्यात डीजे विरोधात पहिली कारवाई;पोलिसांनी हा डीजे केला जप्त

मंगळवेढ्यात डीजे विरोधात पहिली कारवाई;पोलिसांनी हा डीजे केला जप्त 

मंगळवेढा/प्रतिनिधी :- 

मंगळवेढा तालुक्यातील पडळकरवाडीत मंगळवारी अष्टविनायक गणेश तरुण मंडळाची मिरवणूक सुरु असताना पोलिसांनी डीजे ताब्यात घेत पोलिस  ठाण्यात आणून ठेवला.

हा डीजे बिरा महादेव दुधाळ (रा.पडळकरवाडी) यांच्या मालकीचा आहे.या कारवाईमुळे आगामी मिरवणुकांमध्ये पारंपरिक वाद्याच्या वापरास मदत होणार आहे. 

      डीजे व लेसर लाईटमुळे गणेश विसर्जन मिरवणूक बघण्यास आलेल्या नागरिकांच्या आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांचा विचार करता जिल्ह्यात २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर दरम्यान सार्वजनिक गणेश मंडळांना मिरवणुकीत डीजे व लेसर लाईटचा वापर करण्यास प्रतिबंधाचा आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जारी केला आहे. याची मंगळवेढा पोलिसांकडून सर्वत्र काटेकोर अंमलबजावणी सुरू आहे.
---------------------------------------------------
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन होईल म्हणून डीजे मिरवणुकीत आल्यानंतर ताब्यात घेत पोलिस ठाण्यात जप्त करून ठेवला आहे. गणेशोत्सव संपल्यानंतर तो परत दिला जाईल. गणेशोत्सव तालुक्यातील कोणत्याही मंडळांनी यापुढे डीजे लावू नये. अन्यथा गुन्हा दाखल करण्यात येईल.

 - दत्तात्रय बोरीगिड्डे, पोलिस निरीक्षक.

पुढारी वृत्तसेवा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.