मंगळवेढा / प्रतिनिधी:-
मंगळवेढा तालुक्यातील ढवळस गावात संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मराठा आरक्षणासाठी निघणाऱ्या 29 ऑगस्ट 2025 रोजी मुंबई मोर्च्यासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सर्वप्रथम प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
सदर बैठकीचे अध्यक्ष स्थान माजी मुख्याध्यापक शिवश्री देवाप्पा हेंबाडे,माजी सरपंच शिवश्री आबासाहेब मोरे व प्रमुख मार्गदर्शक पाहुणे मंगळवेढा सकल मराठा समाज समन्वय शिवश्री प्रकाश मुळीक सर, वारी परिवार संस्थापक अध्यक्ष शिवश्री सतीश दत्तू यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली.
यावेळी प्रमुख पाहुणे मंगळवेढा सकल मराठा समाज समन्वय शिवश्री प्रकाश मुळीक सर यांचा सत्कार माजी मुख्याध्यापक शिवश्री देवाप्पा हेंबाडे , वारी परिवार संस्थापक अध्यक्ष शिवश्री सतीश दत्तू यांचा सत्कार उद्योजक शिवश्री रवींद्र हेंबाडे यांच्या शुभहस्ते गुलाबपुष्प देऊन करण्यात आला.
मराठा आरक्षणासाठी संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 29 ऑगस्ट मुंबई मोर्चा संदर्भात या बैठकीत खालील विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.गावातील प्रत्येक मराठा बांधवांच्या घरी जाऊन पत्रके व तांदूळ वाटप करणे.आपल्या गावामध्ये मेन चौकात मोठा डिजिटल बोर्ड लावणे.मोर्चाच्या तयारीसाठी वारंवार मीटिंग बोलवणे.एक घर एक गाडी याचं नियोजन करणे.गावातील श्रीमंत व नेतेमंडळी कडून मोर्चा साठी लागणारी आर्थिक मदत घेणे.टू व्हीलर व फोर व्हीलर वरती स्टीकर चिटकवणे.
शिक्षक,डॉक्टर,इंजिनीयर,नोकरदार तसेच उद्योगपती यांच्याकडून चारचाकी गाडीची उपलब्धता करणे.
आपल्या मित्रांना व नातेवाईकांना आरक्षणाचे महत्त्व समजावून सांगून मुंबई मोर्चासाठी वारंवार फोन करणे व त्यांना प्रवृत्त करणे.फेसबुक,व्हाट्सअप व इंस्टाग्राम तसेच इतर सोशल मीडिया वरती मोर्चा संदर्भातील पोस्ट आज पासून दररोज व्हायरल करणे.ही लढाई आरपारची व अंतिम आहे त्यामुळे इतर कामे बाजूला सारून समाजाच्या भविष्यासाठी वेळ देणे आवश्यक आहे.आदी विविध विषयावर अतिशय सविस्तर चर्चा झाली असून तरी आपल्या ढवळस गावातील मराठा बांधव जास्तीत - जास्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाची प्रस्तावना शिवश्री सुनील मोरे,सूत्रसंचालन संभाजी बिग्रेड मंगळवेढा तालुका अध्यक्ष शिवश्री आनंदा मोरे यांनी तर आभार प्रदर्शन विकास सेवा सोसायटी संचालक शिवश्री नवनाथ हेंबाडे यांनी केले.