वृक्ष लागवड व संगोपनाच्या उत्तम कार्याबद्दल पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते वारी परिवाराचा सन्मान

वृक्ष लागवड व संगोपनाच्या उत्तम कार्याबद्दल पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते वारी परिवाराचा सन्मान

मंगळवेढा/प्रतिनिधी :- 

मंगळवेढा-पंढरपूर हरित पालखी महामार्गावर वृक्ष लागवड व संगोपनाचे उत्तम कार्य करुन पर्यावरणाचे रक्षण केल्याबद्दल सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते वारी परिवाराचा प्रशंसापत्र देऊन सन्मान करण्यात आला पंढरपूर वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना शुद्ध प्राणवायू व गार सावली मिळावी.

 यासाठी वृक्षमित्र हभप शिवाजी महाराज मोरे यांच्या मार्गदर्शनातून व वारी परिवाराच्या श्रमदानातून दिनांक ५ जून २०१९ पासून सदर उपक्रम हाती घेऊन ९२०० वृक्षांचे रोपण करून संवर्धनाचे कार्य केले असून महाराष्ट्रातील हरित मार्गाचा पहिला पायलट प्रकल्प यशस्वी झाला आहे. 
आत्ताच झालेल्या आषाढी वारीचा आढावा घेण्यासाठी पंढरपूरला जात असताना हरित मार्गाच्या पायलट प्रकल्पास भेट देऊन अतुल कुलकर्णी यांनी समाधान व्यक्त केले होते.सदर कामाची दखल घेऊन सोलापूर ग्रामीण अधीक्षक कार्यालयाच्या वतीने वारी परिवाराचा सन्मान करण्यात आला.

यावेळी मंगळवेढा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरिगिड्डे,नामदेव शिंदे, महेश ढवान,रणजित माने,प्रा विनायक कलुबर्मे यांचेसह जिल्ह्यातील अनेक पोलीस निरीक्षक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.