महात्मा बसवेश्वर व संत चोखामेळा स्मारकाबाबत लवकरच निर्णय घेऊ - देवेंद्र फडणवीस ;भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांच्या निवेदनानंतर आश्वासन

महात्मा बसवेश्वर व संत चोखामेळा स्मारकाबाबत लवकरच निर्णय घेऊ - देवेंद्र फडणवीस

भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांच्या निवेदनानंतर आश्वासन

मंगळवेढा/प्रतिनिधी :- 

          मंगळवेढा येथील जगतज्योती महात्मा बसवेश्वर व संत चोखामेळा यांच्या स्मारकाबाबत लवकरच ठोस अशी भूमिका घेऊ असे आश्वासन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिले . 
आषाढी वारी निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस हे पंढरपूर दौऱ्यावर येत असताना सोलापूर विमानतळ येथे भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांनी त्यांच्या स्वागत केले , या स्वागतादरम्यान जगतज्योती महात्मा बसवेश्वर त्यासोबतच संतश्रेष्ठ चोखामेळा महाराज यांच्या स्मारकाबाबत निवेदन दिले व तशा पद्धतीचे सर्व कागदपत्र आजपर्यंत झालेला पाठपुरावा या संदर्भात चर्चा केली. या चर्चेदरम्यान दोन्ही स्मारक हा अजेंडा वरचा विषय असून त्याबाबत लवकरात लवकर अशी ठोस भूमिका घेऊ असे आश्वासन देवेंद्रजी फडणवीस यांनी दिले आहे . 

सदरील निवेदन दिल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना जिल्हाध्यक्ष चव्हाण म्हणाले , " मंगळवेढा संतांची भूमी असून जगतज्योती महात्मा बसवेश्वरांचे देखील वास्तव या भूमीला लाभलेला आहे. यापूर्वी देखील महात्मा बसवेश्वरांच्या स्मारकाबाबत देवेंद्र फडणवीस यांनी आग्रही भूमिका घेत सर्व मंजुरी करत एक राष्ट्रीय स्मारक करण्याबाबतचा निर्णय घेतला होता . परंतु काही तांत्रिक कारणांमुळे ते होऊ शकलं नाही . त्यासोबतच संतश्रेष्ठ चोखामेळा महाराजांचा देखील एक राज्यस्तरीय स्मारकाचा निर्णय देवेंद्रजी फडणवीस यांनीच घेतलेला होता . तो देखील आपण लवकरात लवकर पाठपुरावा करून नक्की करणार असल्याचं त्यांनी सांगितलेला आहे . दोन्ही स्मारक हे यापूर्वी देखील फडणवीस साहेबांच्या आग्रहाचे विषय असून त्याकरता ते सकारात्मक आहेत . आज देखील त्यांना स्वागतासाठी भेटलो असताना बसवेश्वर स्मारकांची संपूर्ण फाईल दाखवण्यात आलेली आहे , यावेळी सदरील स्मारकाबाबत लवकरच निर्णय घेऊ आणि त्याकरता ज्या ज्या तरतुदी कराव्या लागतील त्या करू . असे ठाम आश्वासन त्यांनी दिलेला आहे . त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की यापूर्वी देखील आणि आताही मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा हातूनच हे दोन्ही स्मारक होऊ शकतील . आणि त्याकरता ते सकारात्मक देखील आहेत . " अशा पद्धतीचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले . 

  सोलापूर विमानतळावरती स्वागत करत असताना आ. सुभाष बापू देशमुख , आ.सचिन कल्याणशेट्टी , आ. देवेंद्र कोठे, शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर , भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सुदर्शन यादव , जिल्हा सरचिटणीस विकास वाघमारे उपस्थित होते .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.