मंगळवेढा (प्रतिनिधी) :-
अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ मुंबई च्या वतीने एप्रिल - मे २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या पखवाज वादन परीक्षेत चि.शिवराज ज्ञानेश्वर भगरे याने उज्वल यश संपादन केले आहे.
सांगोला संचलित चैतन्य संगीत विद्यालय शाखा मंगळवेढा येथील विद्यार्थी चि.शिवराज ज्ञानेश्वर भगरे याने पखवाज वादनाचे शिक्षण श्री स्वामी समर्थ मंदिर,शनिवार पेठ येथे घेत होता. त्याने पखवाज वादनाचा छंद जोपासला आहे. पखवाज वादन चौथ्या परीक्षेत १५० पैकी १२२ गुण मिळवून ए ग्रेड प्राप्त करून उज्वल यश संपादन केले आहे.
त्याच्या यशाबद्दल चैतन्य संगीत विद्यालयाचे सर्वेसर्वा प्रसाद पाटील, अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प.सुधाकर इंगळे महाराज, ह.भ.प.राजाराम कदम, संगीत विशारद ह.भ.प.सिद्धेश्वर कोळी, तबला विशारद ह.भ.प.सुदर्शन माने, मंगळवेढा शहरातील भजन प्रेमी आदिंनी त्यांचे अभिनंदन व कौतुक केले आहे.