संत भूमी मंगळवेढा शहरातील मटन चिकन व मच्छी मार्केट सर्व दुकाने शहराबाहेर विस्थापित करावीत

संत भूमी मंगळवेढा शहरातील मटन चिकन व मच्छी मार्केट सर्व दुकाने शहराबाहेर विस्थापित करावीत

मंगळवेढा/प्रतिनिधी :-

संत भूमी मंगळवेढा शहरातील मटन चिकन व मच्छी मार्केट सर्व दुकाने शहराबाहेर विस्थापित करावीत अशा आशयाचे आज निवेदन भाजपा तर्फे देण्यात आले मंगळवेढा ही संतभूमी असून जर वर्षी लाखो हजारो भाविक मंगळवेढा शहराला भेट देतात मंगळवेढा शहरातून संत गजानन महाराज संत दामाजी महाराज यांच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने जातात.

अशा धार्मिक संतांच्या नगरीत उघड्यावर मटन, मांस, मच्छी याची उघड्यावर विक्री होणे धार्मिक पावित्र्याला न शोभणारा आहे व ते नागरिकांच्या आरोग्याच्या हिताचे ही नाही यामुळे मंगळवेढा शहराची प्रतिमा मलीन होत आहे. 

तसेच शहरातील स्वामी समर्थ मंदिराकडे जाताना मच्छी मार्केट मुळे ही मोठ्या प्रमाणात दुर्गंधी असते भाविकांना मोठ्या प्रमाणात याचा त्रास होतो. यामुळे शहरातील वातावरण गलिच्छ होते यावर नगरपालिका प्रशासनाने ताबडतोब कारवाई करावी असे निवेदन दिले.

 या निवेदनावेळी भाजपा शहर अध्यक्ष नागेश डोंगरे, भाजपा जि उपाध्यक्ष सिद्धेश्वर कोकरे , जि उपाध्यक्ष संतोष मोगले, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सुदर्शन यादव ,भाजपा अनुसूचित मोर्चा अध्यक्ष खंडू खंदारे ,ओबीसी मोर्चा अध्यक्ष सुनील रत्नपारखे ,दामाजी नगर ग्रामपंचायत सदस्य संजय माळी ,भाजपा एसी मोर्चा गजानन शिंदे ,युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष अजित लेंडवे, युवा मोर्चाचे प्रतीक पडवळे ,कपिल हजारे इ भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.