आवताडे स्पिनर्स मध्ये ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा ,आवताडे स्पिनर्स प्रजासत्ताक दिनानिमित्त गुणवंत कामगारांचा सन्मान

आवताडे स्पिनर्स मध्ये ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा 

आवताडे स्पिनर्स प्रजासत्ताक दिनानिमित्त गुणवंत कामगारांचा सन्मान 

मंगळवेढा / सचिन हेंबाडे :-

मंगळवेढा येथील आवताडे स्पिनर्स
प्रायव्हेट लिमिटेड आवताडे सूत मिल मध्ये भारतीय ७६ व्या प्रजासत्ताक दिन उत्साहाने साजरा करण्यात आला.

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सोमनाथ आवताडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला.त्यानंतर सन २०२४ मधील गुणवंत कामगाराचा सत्कार करण्यात आला.

आवताडे सुतमिलच्या विविध खात्यात कार्यरत असणाऱ्या कामगारांना उत्पादनातील योगदान ओव्हर टाईम मध्ये केलेले सहकार्य कामगारांचे खात्यात असणारी वर्तणूक, कामावरची निष्ठा, प्रामाणिकपणा या गोष्टी लक्षात घेऊन गुणवंत कामगारांची निवड करण्यात येते. यावेळी गुणवंत कामगारांना संसार उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात येते.

यावेळी सुतमीलच्या ३२ कामगारांना गुणवंत कामगार म्हणून गौरवण्यात आले. यावेळी आवताडे स्पिनर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या सर्व सुरक्षा कर्मचार्यांनी अतिशय देखणी पथ संचलन केले. 

यावेळी बोलताना सोमनाथ आवतांडे यांनी सर्वाना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर भारतीय प्रजासत्ताकाने दिलेल्या स्वातंत्र, समता, विश्वबंधुत्व या सूत्रीच्या आधारे आपला उत्कर्ष करून घ्यावा.आपल्या हक्काबरोबर देशासाठी आपले कर्तव्य ही महत्वाचे असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

 सदर कार्यक्रमास यूनिट हेड सुनील कमते,दिगंबर यादव, अनिल काळपगार,दत्तात्रय भोसले, विनायक नलवडे, सुरेश अमनवार, दीपक कोळी,अनिल केदार,कैलास जगताप,जैनुद्दीन शेख,रजाक निगेवान,इंद्रजित कुलकर्णी ,मुन्ना शेख,मुस्तप्पा मुलाणी,संभाजी जाधव,गणेश जाधव,रोहित भालेराव,अजय शिंदे,विकास बेदरे,विजय मळगे,अमोल भंडगे,त्याचबरोबर सर्व कर्मचारी व महिला कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.