मंगळवेढा शहरातील व्यापारी व शेतकरी यांनी घेतली आ समाधान आवताडे यांची भेट , काळ्या शिवारातील पिके व धान्य यांची चोरी-नुकसान करणाऱ्यांचा बंदोबस्त करण्याची केली मागणी

मंगळवेढा शहरातील व्यापारी व शेतकरी यांनी घेतली आ समाधान आवताडे यांची भेट

काळ्या शिवारातील पिके व धान्य यांची चोरी-नुकसान करणाऱ्यांचा बंदोबस्त करण्याची केली मागणी 

मंगळवेढा/ प्रतिनिधी -

जनसंपर्क कार्यालय, मंगळवेढा येथे मंगळवेढा शहरातील व्यापारी महासंघ पदाधिकारी,उद्योजक-व्यावसायिक तसेच शेतकरी मंडळींनी आपल्या मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांची आमदार दालनात भेट घेऊन काळ्या शिवारातील पिकांना आणि शेतकऱ्यांना विशिष्ट लोकांकडून होणारा नाहक त्रास आणि नुकसान यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली.

या मंडळींची सदर मागणी जाणून घेतल्यानंतर आमदार आवताडे यांनी पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क करुन आवश्यक आणि तात्काळ पोलीस कारवाई करुन शेतकऱ्यांना अभय देण्याचे निर्देशीत केले आहे.

अखंड मेहनत आणि मुबलक अर्थिक बाबी उभ्या करुन पिकवलेल्या धान्यांना पदरी पाडून घेताना शेतकरी वेठीस धरण्याचा कोणी प्रयत्न अथवा डाव करत असेल तर त्याची दया न करता त्यावर वेळीच कायद्याचा बडगा उगारला पाहिजे अशा सक्त सूचना आमदार आवताडे यांनी यावेळी पोलीस व्यवस्थेला दिल्या आहेत.

यावेळी व्यापारी महासंघ अध्यक्ष प्रकाश गायकवाड, भाजपा जिल्हा संघटन सरचिटणीस शशिकांत चव्हाण, माजी नगराध्यक्ष धनंजय खवतोडे, माजी नगरसेवक अरुण किल्लेदार, अजित जगताप, प्रविण हजारे, सतिश हजारे, नितीन सुरवसे, सुशांत हजारे आदी पदाधिकारी तसेच शेतकरी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.