रुग्णालयाची पाहणी करून जाणून घेतल्या अडीअडचणी
मंगळवेढा / प्रतिनिधी :-
मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयामध्ये सेवा सुविधांचा अभाव जाणवत असून कर्मचारी रुग्णांना व्यवस्थित वागणूक देत नाहीत ओपीडी वेळेवर सुरू केली जात नाही अशा काही तक्रारी आमदार समाधान आवताडे यांचेकडे प्राप्त झाल्या होत्या त्या तक्रारीस अनुसरून बुधवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास आमदार समाधान आवताडे यांनी अचानक रुग्णालयात भेट देऊन रुग्णालयाच्या कारभाराची पाहणी केली.
यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रदीप खांडेकर गटविकास अधिकारी योगेश कदम मा नगरसेवक खंडू खंडारे बबलू सुतार कल्याण कोळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मयुरी कुंभार,डॉक्टर महेश रोंगे,डॉक्टर रेवता स्वामी हे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी आमदार समाधान आवताडे यांनी ग्रामीण रुग्णालयातील ऑपरेशन थिएटर प्रसूतीगृह त्यांच्यासह विविध वार्डमध्ये जाऊन सविस्तर माहिती घेत वैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
यावेळी उपचार व्यवस्थित केले जातात का औषध हे दिले जातात का बाळंतपणाचे रुग्ण बाहेर पाठवले जातात की येथेच प्रयत्न करून उपचार केले जातात याची सविस्तर माहिती घेत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कामात हाय काय केल्याची तक्रार पुन्हा माझ्याकडे आल्यास कारवाई सामोरे जावे लागेल या ग्रामीण रुग्णालयाच्या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालयाचे काम सुरू होत असून 99 कोटी रुपये सरकार या कामावर खर्च करत आहेत.
त्यामुळे या ठिकाणच्या सोयी सुविधा सुधारणे गरजेचे असून रुग्णांना कोणताही त्रास न होता रुग्ण येथून आनंदाने बरा होऊन परत गेला पाहिजेत असे काम सर्वांनी करावे असे आवाहन त्यांनी अधिकारी कर्मचाऱ्यांना केले.
यावेळी आरोग्य विभागाचे परिचारिका सुवर्णा सरताळे,रूपाली कुलकर्णी,स्वरा काशीद,सुनिता सातालोलु,कपाटे,क्षयरोग पर्यवेक्षक प्रल्हाद नाशिककर,औषध निर्माण अधिकारी पांडुरंग कोरे,अविनाश पट्टणशेट्टी कर्मचारी उपस्थित होते.