मंगळवेढा आगारात महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त मोफत आरोग्य शिबिर संपन्न

मंगळवेढा आगारात महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त मोफत आरोग्य शिबिर संपन्न

मंगळवेढा / प्रतिनिधी :-

मंगळवेढा येथे दिनांक 2 ऑक्टोंबर 2024 रोजी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त श्री संत दामाजी मेडिकल फाउंडेशन रिसर्च सेंटर मंगळवेढा व राज्य परिवहन मंगळवेढा आगार यांच्या संयुक्त विद्यमाने राज्य परिवहन मंगळवेढा आगारात मोफत आरोग्य शिबिर संपन्न झाले. सदर शिबिरात 58 चालक वाहक यांत्रिक व प्रशासकीय कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. 
सदर कार्यक्रमासाठी महिला हॉस्पिटल मंगळवेढा चे सर्वेसर्वा डॉक्टर श्री नंदकुमार शिंदे तसेच त्यांचे सहकारी डॉक्टर सुरज फराटे, डॉक्टर निखिल गायकवाड, डॉक्टर पूजा आवळेकर, डॉक्टर दशरथ फरकंडे, श्री संतोष कोळसे पाटील, श्री सोमनाथ इंगळे, श्री सोमनाथ हेगडे, पूजा गवळी, ऐश्वर्या बनसोडे यांनी व पत्रकार श्री औदुंबर ढावरे यांचे आरोग्य तपासणी वेळी मोलाचे सहकार्य केले.

तसेच सदर कार्यक्रमावेळी राप मंगळवेढा आगाराचे आगार व्यवस्थापक श्री संजय भोसले, स्थानक प्रमुख श्री शरद वाघमारे, वाहतूक निरीक्षक श्री योगेश गवळी, आधार लेखाकर श्री योगेश कांबळे, तसेच वरिष्ठ लिपिक श्री अमोल काळे, श्री परमेश्वर भालेकर, उमेश ननवरे, धनाजी पाटील, दत्तात्रय रायबान, संतोष चव्हाण, गणेश गवळी, व अमोल शिनगारे उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.