मंगळवेढा / प्रतिनिधी :-
मंगळवेढा शहर व तालुका सकल मराठा समाज यांचे कडून जाहीर आवाहन करणेत येते की मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी मनोजदादा जरांगे पाटील यांचे वर्षभरातील सहावे आमरण उपोषण आहे व गेले 8 दिवसापासून त्यांचे आमरण उपोषण सुरू आहे जरांगे पाटील यांची प्रकृती अत्यंत खालावली आहे परंतु सरकार या आंदोलनाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून एक प्रकारे जरांगे पाटील व मराठा समाजाच्या संयम व सहनशीलतेचा अंत पहात आहे व समाजाची अवहेलना करत आहे.
या निष्ठूर व निर्दयी सरकारचा निषेध व मनोज दादा जरांगे यांचे समर्थनार्थ सकल मराठा समाजाच्या वतीने गुरुवार दिनांक 26 सप्टेंबर 2024 रोजी होणाऱ्या बंदमध्ये सर्व शासकीय,निमशासकीय,सहकारी संस्था व व्यापारी यांनी बंदला पाठिंबा देवून खुलेपणाने बंदमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन सकल मराठा समाज मंगळवेढा तालुका यांच्यावतीने करण्यात आले.