लोकसभा उमेदवार राम सातपुते यांचा मंगळवेढा तालुक्यात आमदार समाधान आवताडे यांच्या समवेत प्रचार दौरा

लोकसभा उमेदवार राम सातपुते यांचा मंगळवेढा तालुक्यात आमदार समाधान आवताडे यांच्या समवेत प्रचार दौरा

मंगळवेढा /प्रतिनिधी:- 

सोलापूर लोकसभा सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपा व महायुतीचे उमेदवार राम विठ्ठल सातपुते यांचा पंढरपूर- मंगळवेढा मतदार संघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या समवेत दि.01.05.2024 रोजी मंगळवेढा तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये प्रचार दौरा होणार आहे. सर्वसामान्य जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या माध्यमातून करण्यात आलेली विविध विकास कामे व पुढील काळामध्ये देश विकासाच्या बाबतीत असणारे व्हिजन या सर्व बाबी समोर ठेवून सोलापूर लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला विजयी करण्याचे आवाहन मतदारांपर्यंत या नियोजित प्रचार सभेतून केले जाणार आहे.

सदर दौऱ्यामध्ये बुधवार दिनांक ०१ मे २०२४ रोजी सकाळी ८.०० वाजता माचणूर, ८.३० वाजता ब्रम्हपुरी, ८.४५ वाजता मुंढेवाडी, ९.०० वाजता रहाटेवाडी, ९.२० वाजता तामदर्डी, ९.४५ वाजता तांडोर, १०.०० वाजता सिद्धापूर, १०.३० वाजता अरळी, ११.०० वाजता बोराळे, ११.३० वाजता डोणज, १२.०० वाजता नंदूर, १२.३० वाजता बालाजीनगर, १२.४५ कर्जाळ/कात्राळ, ०१.०० वाजता कागष्ट तसेच दुपारी ०१.३० ते ४.०० वाजेपर्यंत राखीव त्यानंतर ४.०० वाजता सलगर बु., ४.३० वाजता लवंगी, ५.०० वाजता आसबेवाडी, ५.३० वाजता सोड्डी, ६.०० वाजता येळगी, ६.३० वाजता हुलजंती, ७.३० वाजता मरवडे, ८.३० वाजता भालेवाडी अशा स्वरूपात हा नियोजित दौरा संपन्न होणार आहे.

तरी वरील प्रचार दौऱ्यासाठी प्रत्येक गावातील नागरिकांनी मतदार बंधू भगिनींनी, पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.