मंगळवेढा /प्रतिनिधी :-
मंगळवेढा तालुक्यातील कचरेवाडी येथे 52 पत्त्याच्या तीन पानावर तिरट नावाचा जुगार खेळणाऱ्या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकून 1680 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून आरोपींना फिल्मी स्टाईलने जीवाची बाजी करीत पाठलाग करून पकडण्याचे धाडस दाखविले असून या प्रकरणी 9 जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी कचरेवाडी येथे तिरट नावाचा जुगार खेळत असल्याची भूक नियम माहिती पो.नि.रणजीत माने यांना मिळताच त्यांनी सदर ठिकाणी पोलिसांचे एक विशेष पथक पाठविले असता गावाच्या जवळ असलेल्या कॅनल पट्टीजवळ दिलीप मेटकरी यांच्या घरासमोर लिंबाच्या झाडाखाली यातील
आरोपी दिलीप रामा मेटकरी(वय 66),सत्यवान ओमप्रकाश चोरमुले (वय 40),बबन सीताराम शिंदे (वय 38), सोमनाथ विठ्ठल आवळेकर (वय 35),सुभाष बाजीराव गरंडे (वय 42), जोतीराम रामा चव्हाण (वय 58), लालासाहेब दाजी काळूंगे,नवनाथ धर्मा माने,मोहन भारत माने व अन्य अज्ञात तिघे गोलाकार बसून दि.11 रोजी 4:30 वा. 52 पानाच्या पत्त्यावर तीन पानाचे तिरट नावाचा जुगार खेळत असल्याचे पोलिसांच्या छापे प्रसंगी निदर्शनास आले.
पोलिसांनी छापे प्रसंगी 1680 रुपये रोख रक्कम जप्त केली आहे. यावेळी पोलिसांना पाहताच आरोपी शिवारातून सैरावैरा धावत सुटले. पोलिसांनी जीवाची बाजी करीत फिल्मी स्टाईलने पाठलाग करत अखेर 9 आरोपींना ताब्यात घेतले तर तीन आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. याची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल शरद कदम यांनी दिल्यावर सर्व आरोपी विरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम 12 (अ)प्रमाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.