मंगळवेढा शहरात साकारणार विविध संतांचे शिल्प ...
मंगळवेढा/ प्रतिनिधी:-
महाराष्ट्र नवनिर्माण सेना मंगळवेढा शहर यांच्या वतीने नगरपरिषद मंगळवेढा यांच्याकडे निवेदन सर्व संतांचे वास्तुशिल्प उभा करणेबाबत निवेदन दिले असता त्याला तात्काळ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी कोल्हे मंजुरी दिली आहे.
आजपर्यंत मंगळवेढ्याच्या राजकारणात वापरला जाणारा शब्द म्हणजे थोर संतांच्या पवित्र भूमीत आपले सहर्ष स्वागत करीत आहे कोणताही नेता मंत्री मंगळवेढा शहरात त्यांचा आगमन होत असताना असे बॅनर लागले जातात. थोर संतांच्या पवित्र भूमीत आपले सहर्ष स्वागत परंतु अस्तित्वात मंगळवेढ्यात संतांचे दर्शन कुठे होतच नाही दोन संत सोडले बाकी संतांचे दर्शन होणार तरी कुठे होणार तरी कसं त्याच अनुषंगाने मनुष्याचे राजवीर हजारे यांच्या माध्यमातून नगर परिषदेकडे जी मागणी केली त्या मागणीला मुख्याधिकारी कोल्हे साहेबांनी तात्काळ मंजुरी दिली.
त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार या सर्व संतांचे वास्तुशिल्प उभा करून मंगळवेढ्यात एक खऱ्या अर्थाने संतभूमी असल्याचा जणू दाखलाच आपल्याला मिळेल व येणाऱ्या नवीन पिढीला सुद्धा याची संपूर्ण कल्पना व माहिती मिळेल त्यासाठीच येत्या तीन-चार महिन्यांमध्ये एक काम पूर्ण होईल अशी आशा आहे. आज पर्यंत आपल्या मंगळवेढा शहरातील संतांच्या बाबतीत कोणत्याही पक्षाच्या पुढाऱ्याने राजकीय नेत्याने मंत्र्यांनी मंगळा शहरातील संतांसाठी कोणीच पुढाकार घेतला नसून त्यामुळेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना मंगळवेढा शहराध्यक्ष राजवीर हजारे यांनी सातत्याने पाठपुरावा करून याची मंजुरी त्वरित मिळवून मंगळवेढ्यात शहरातील एक नवीन व चांगलं कार्य हाती घेत आहे.
व यापुढे कायमच शहराच्या विकासासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कटिबद्ध असेल. त्यामुळेच आपल्या संतांच्या शहराच्या विकासासाठी मंगळवेढा शहरातील सर्व जनतेने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या खंबीरपणे उभा आहे असे राजवीर हजारे यांनी म्हटले आहे.