आमदार समाधान आवताडे यांच्या माध्यमातून तालुक्यातील २१ सोसायटी संस्थांना मंजुरी

आमदार समाधान आवताडे यांच्या माध्यमातून तालुक्यातील २१ सोसायटी संस्थांना मंजुरी 

मंगळवेढा / प्रतिनिधी-

केंद्रात सहकार खाते निर्माण झाल्यानंतर सहकारी संस्था काढण्याच्या सूचना भाजपा पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या होत्या. त्यामध्ये पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार यांनी मंगळवेढा तालुक्यामध्ये २१ सोसायटी संस्थांना मंजुरी मिळवली आहे. सदर मंजुरीचे पत्र आ आवताडे यांना जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था तथा सावकारांचे जिल्हा निबंधक सोलापूर यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले आहे.

आमदार आवताडे यांनी मंगळवेढा तालुक्यातून नव्याने २२ विकास सोसायटी संस्थांसाठी प्रस्ताव मंजुरीसाठी सादर केले होते त्यापैकी २१ प्रस्ताव मंजूर झाले आहेत. नव्याने मंजूर झालेल्या या सोसायटी संस्थांमुळे आगामी काळामध्ये तालुक्यातील जिल्हा बँक, बाजार समिती, खरेदी विक्री संघ व श्री.संत दामाजी सहकारी साखर कारखाना इत्यादी सहकारी संस्थांच्या निवडणुकीमध्ये मदत होणार आहे. त्यापेक्षा ज्यादा जे शेतकरी कर्ज पुरवठ्यापासून वंचित राहिले होते त्या संबंधित २१ गावातील शेतकऱ्यांना अर्थ पुरवठा होण्यासाठी मोठे सहकार्य लाभणार आहे. तसेच सहकारापासून दूर गेलेला मोठा वर्ग या संस्थांच्या निर्मितीमुळे पुन्हा सहकाराशी जोडला जाणार असल्याची माहिती आमदार समाधान आवताडे यांनी दिली आहे.

सोलापूर जिल्ह्यामध्ये दिवंगत आमदार स्व. दिगंबर बागल यांनी करमाळा तालुक्यामध्ये १६ तर दक्षिण सोलापूर तालुक्यात सुरेश हसापूरे यांनी १४ विकास सोसायटी मंजूर केल्या होत्या. अगदी त्याच पद्धतीने आमदार समाधान आवताडे यांच्या माध्यमातून मंगळवेढा तालुक्यामध्ये २१ विकास सोसायटी संस्थांना मंजुरी आणण्यात त्यांना यश प्राप्त झाले आहे. येड्राव, हिवरगाव, माचणूर, रहाटेवाडी, आंधळगाव, लक्ष्मी दहिवडी, मानेवाडी, रेवेवाडी नंदेश्वर, भोसे, शिरसी, मारापुर, बावची, तळसंगी, कात्राळ, डोणज, मुंढेवाडी, बोराळे या गावांसह मंगळवेढा शहर व परिसरात दोन सोसायटी संस्थांची निर्मिती होणार आहे.
-----------------------------------------------------------------------
चौकट - 
मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी मतदारसंघातील विविध विकास कामांना कोट्यावधी रुपयांच्या निधीच्या माध्यमातून चालना देत असतानाच मंगळवेढा तालुक्यातील सहकार जाळे मजबूत करून शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी मंजूर केलेल्या २१ सोसायटी संस्थांमुळे तालुक्यातील अर्थकारण व सहकार कार्यक्षेत्रांना मोठी गती मिळणार आहे - सुरेश भाकरे माजी संचालक*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.