मंगळवेढा महामंडळ आगारा तर्फे पितांबर घोडके यांचा सत्कार

मंगळवेढा महामंडळ आगारा तर्फे पितांबर घोडके यांचा सत्कार

मंगळवेढा/ प्रतिनिधी :-

मंगळवेढा तालुक्यातील बोराळे गावातील एका साधारण शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या श्री पितांबर घोडके यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत रा.प.महामंडळात वाहक या पदावर नोकरी मिळवली.

त्यानंतर त्यांची स्वकर्तृत्वावर रा.प.महामंडळाच्या सुरक्षा व दक्षता खात्यात सहाय्यक सुरक्षा निरीक्षक या पदावर नेमणूक झाली.यानंतर त्यांची राखण व पहारा निरीक्षक या पदावर सोलापूर विभागातच पदोन्नती झाल्याने मंगळवेढा आगाराकडून आगार व्यवस्थापक संजय भोसले त्यांचा हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला व पुढील कारकिर्दीस शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी आगार व्यवस्थापक संजय भोसले,सुरक्षा व दक्षता अधिकारी महेंद्र टापरे ,स‌.सु.नि.सौ.आटपाडकर ,स.सु.नि.सौ.पाटील,वरिष्ठ लिपिक अमोल काळे, वाहतूक नियंत्रक संतोष चव्हाण, दत्ता रायभान, सचिन माने, लेखाकार योगेश कांबळे, वाहतूक निरीक्षक योगेश गवळी, गणेश गवळी,उमेश ननवरे, पत्रकार औदुंबर ढावरे उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.