दहा जणांविरुद्ध गुन्हे दाखल 3 हजार 950 रुपये रोख रक्कम जप्त
मंगळवेढा /प्रतिनिधी :-
मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती येथे समाजमंदिराशेजारी गोलाकार बसून मन्ना नावाचा जुगार खेळणाऱ्या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकून 3 हजार 950 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून दहा जणांविरुद्ध महाराष्ट्र पोलीस जुगार कायदा कलम 12(अ) नुसार कारवाई करण्यात आली.
पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी, दि.15 रोजी दुपारी 3:10 वा. हुलजंती दुरक्षेत्र हद्दीत खाजगी वाहनाने पोलीस पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की हुलजंती गावातील समाज मंदिराशेजारी 52 पत्त्याचा मन्ना नावाचा जुगार खेळत आहेत.
पोलिसांनी सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता यामध्ये संतोष सिद्राम अक्की (वय 40), म्हाळाप्पा परसाप्पा बंडगर (वय 49), गौतम कोमन्ना कांबळे (वय 58), सिद्धप्पा म्हाळाप्पा पेटरगी (वय 58), चंद्रकांत शिवाप्पा निगडे (वय 42), तिप्पणा बाळाप्पा कोटे (वय 42), किशोर हुवाप्पा भोरकडे (वय 40) सर्व रा.हुलजंती, चिदानंद शिवाप्पा तेलगाव (वय 48), इश्वराप्पा रायगोंडा बगली (वय 40 रा. शिरढोण),शिवाजी सोमाराया जकवडर (वय 35) आधी सदर ठिकाणी गोलाकार रिंगण करून 52 पत्त्याचा पानावर मन्ना नावाचा जुगार खेळत असल्याचे पोलिसांना निदर्शनास आले.
सदर ठिकाणी पोलिसांनी 3 हजार 950 रुपये रोख रक्कम, पेन ,पत्त्याचा डाव पोलिसांनी जप्त केला.याची फिर्याद पोलीस नाईक सचिन बनकर यांनी दिली आहे.