लाळ - खुरकूत प्रादूर्भाव लसीकरण लवकरच सुरू होणार - आमदार समाधान आवताडे

लाळ-खुरकूत प्रादूर्भाव लसीकरण लवकरच सुरू होणार - आमदार समाधान आवताडे

मंगळवेढा (प्रतिनिधी):-
         
            गेल्या काही दिवसांपासून जनावरांना जेरीस आणलेल्या (एफ.एम.बी.) अर्थात लाळ-खुरकूत या आजारांवर पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील मतदारसंघात येत्या शनिवारपासून लसीकरण सुरु करण्यात येईल अशी माहिती पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार समाधान आवताडे यांनी दिली आहे.
            जनावरांच्या तोंडातून आवश्यकतेपेक्षा जास्त लाळ गळणे,तोंडात चट्टे पडणे,रवंथ क्रियेत अडथळा निर्माण होऊन त्याचा जनावरांना त्रास होणे आदी लक्षणे जनावरांना दिसून आल्याने अनेक पशुपालक व शेतकरी यांनी सदर आजारावर लसीकरण उपलब्ध व्हावे यासाठी आमदार समाधान आवताडे यांच्याकडे मागणी केली.पशुपालक व शेतकरी यांनी दिलेल्या माहितीनुसार या आजाराचे गंभीर्य  लक्ष्यात घेऊन आमदार समाधान आवताडे यांनी पंचायत समिती अंतर्गत पशुसंवर्धन विभाग व पशुवैद्यकीय विभाग यांच्याकडे याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.या अहवालाची माहिती घेऊन त्यांनी जिल्हा पशुवैद्यकीय विभाग यांना लसीकरणाबाबत सूचना केल्या असता संबंधित अधिकारी यांनी येत्या शनिवारपासून लसीकरण सुरू होईल अशी माहिती दिली.
             पशुपालन हा अनेकांच्या शेती व्यवसायास जोडधंदा आहे.दरवर्षी हिवाळी ऋतू सुरू झाला की एफ. एम. बी. प्रादूर्भाव प्रसारित होण्यास प्रारंभ होतो.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक खोईत लोटलेल्या अनेक पशुपालक व शेतकरी जनावरांच्या या आजारामुळे अधिकच कोलमडला गेला आहे.
              यामुळे या लसीकरण मोहिमेस जास्तीत-जास्त पाठपुरावा करून लसीकरण सुरू करावे अशी मागणी आमदार समाधान आवताडे यांनी केली असता येत्या शनिवारपासून लसीकरण सुरू होईल असे जिल्हा पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्त सोनवणे यांनी सांगितले आहे.



                               पत्रकार 
                           सचिन हेंबाडे
                    मो.नं.9637545262
                          8668236467

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.