पंढरपूर येथे नामदेव पायरी जवळ थोर राष्ट्रपिता महात्मा गांधी, भारताचे दुसरे पंतप्रधान भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी

पंढरपूर येथे नामदेव पायरी जवळ थोर राष्ट्रपिता महात्मा गांधी, भारताचे दुसरे पंतप्रधान भारतरत्न लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

पंढरपूर(प्रतिनिधी):-

                   सत्य, अहिंसा आणि शांतता या शस्त्रांनी जगाला मानवतेचा संदेश देणारे आणि भारताला स्वातंत्र्य मिळवून देणारे महान स्वातंत्र्यसेनानी राष्ट्रपिता महात्मा गांधी जी व जय जवान जय किसान हा मंत्र भारतीयांना देणारे स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान भारतरत्न लालबहादूर शास्त्री जी यांच्या जयंतीनिमित्त पंढरपूर-मंगळवेढा लोकप्रिय आमदार समाधान (दादा) आवताडे व जिल्ह्याचे आमदार प्रशांत (मालक) परिचारक यांनी विनम्र अभिवादन केले. आणि  विठ्ठल मंदिर नामदेव पायरी  परिसर स्वच्छता अभियान मोहीम राबविण्यात आली आणि मंदीर परिसर स्वच्छताकरून विनम्र अभिवादन करण्यात आले.

            
                  यावेळी भाजपा चे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दादा देशमुख, भाजपा जिल्हाउपाध्यक्ष सुभाष मस्के सर  पंचायत समिती मा.उपसभापती प्रशांत भैय्या देशमुख, युवा नेते प्रणव परिचारक, पंचायत समिती मा. उपसभापती अरुण तात्या घोलप, पंचायत समिती सदस्य श्री. दादा मोटे,भाजपा आध्यक्ष विक्रम भैय्या शिरसट,पंढरपूर तालुका भाजपाध्यक्ष भास्कर कसगावडे,माऊली हळणकर,  पंढरपूर तालुका युवा मोर्चा अध्यक्ष सुनील काका भोसले, पंढरपूर शहर युवा मोर्चा अध्यक्ष रोहित (लाल) पानकर भैय्यासाहेब कळसे, उपसरपंच रमेश आदमाने,रमेश क्षिरसागर,भाऊ टमटम, पांडुरंग करमकर,परमेश्वर पाटील,प्रसाद सातपुते,व भाजप युवा मोर्चाचे सर्व पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.