नगरपरिषदेने चांगल्या दर्जाचे काम करावे - आ.समाधान आवताडे
मंगळवेढा (प्रतिनिधी):-
भारतीय जनता पार्टी तर्फे आज मंगळवेढा नगरपरिषदेवर विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले . मंगळवेढा शहरामध्ये रस्ते , पाणी , स्वछता , तसेच वाहतूक अडथळा असे विविध प्रश्न निर्माण झाले आहेत . तसेच विकासकामांच्या नावाने नगरिकांची मते न जाणून घेता कामे चालू आहेत . आणि सदरील कामाचा नागरिकांना त्रास होत असल्याचे दिसून येत आहे . भारतीय जनता पक्षाच्या वतीने शहरातील विविध समस्ये संदर्भात हे आंदोलन करण्यात आले . प्रथम सदरील आंदोलनाचा अशय सुदर्शन यादव यांनी मांडला .
आंदोलनादरम्यान आमदार समाधान आवताडे म्हणाले , " नगरपरिषद प्रशासनाने विकासकामे करताना सर्व भान ठेवले पाहिजे , कामाचा दर्जा टिकवून काम केले पाहिजे . आज शहरात रस्त्यांच्या दुर्दशा दिसून येत आहेत , रस्त्यांची कामे सुरू आहेत पण ते निकृष्ट दर्जाचे केले जात आहेत , नगरपरिषदेने मनमानी कारभार थांबवून लोकांची प्रतिक्रिया घेऊन काम केले पाहिजे . कुठे निधीची कमतरता असेल तर मला सांगा आमदार फंडामधून तो देण्याची तरतूद करण्यात येईल पण मंगळवेढा नगरीत चांगल्या पद्धतीची व सुनियोजित कामे झाली पाहिजेत . आज ज्या मागण्या देत आहे त्याचा विचार तात्काळ करून त्यावर कारवाई करावी अन्यथा ह्यापेक्षा तीव्र आंदोलन भाजप करेल . " अशापद्धतीचे वक्तव्य त्यांनी यावेळी केले .
सदरील आंदोलनात खालील मागण्या मांडण्यात आल्या आहेत .
1 ) सांगोला नाका परिसरातील नागरिकांना प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेतच्या 2018 सर्व्हे नुसार घरकुल देण्याचे निर्णय असून सदरील ठिकाणी बगीचा करण्याचे निर्णय झाला आहे . हा निर्णय गोरगरिबांच्या घरावर घाला करणारा असून तो रद्द करावा व सदरील नागरिकांना घरकुल
2 ) नगरपरिषदेच्या सर्व व्यापारी संकुल साठी प्रत्येक व्यापारी संकुल च्या जवळ वाहनतळ व्यवस्था करण्यात यावी . शहरातील गैबीपीर शॉपिंग सेंटर साठी वाहनतळ व्यवस्था नसल्याने मेन रोड वरती कायम गर्दी झालेली असते .
3 ) शहरामध्ये रस्त्यांची कामे चालू आहेत , सदरील कामे हे आधीचा रस्ता उकरून केली पाहिजेत पण तसे करताना दिसत नाही , रस्त्यांची उंची वाढल्याने गटारी खाली गेल्या आहेत या गटाराचे पाणी नागरिकांच्या घरात , अंगणात जाते . रस्त्यांची कामे आधीचा रस्ता उकरून करावीत .
4 ) शिवप्रेमी चौक ते दामाजी चौक रस्ता पूर्णतः खराब झाला असून तो डांबरीकरण करण्यात यावा .
5 ) पंढरपूर अर्बन ते चोखामेळा चौक रस्ता खराब झाला असून तो तात्काळ करण्यात यावा .
6 ) शहरातील पाणीपुरवठा सध्या विस्कळीत व अस्वच्छ होत आहे , अस्वच्छ पाणीपुरवठा झाल्याने नागरिकांची प्रकृती बिघडत आहे. सध्या रोगराईचा काळ असल्याने पाणीपुरवठा स्वच्छ व वेळेवर करण्यात यावा .
7 ) सध्या डेंगू चा प्रादुर्भाव वाढत वासल्याचे दिसून येत आहे तात्काळ त्याकरता उपाययोजना सुरू करण्यात यावी .
8 ) शहरातील गटारी वेळेवर काढण्यात याव्यात , सांगोला नाका ते बोराळे नाका मेन गटार लाईन वारंवार तुंबलेली असते त्याचे काम करून घेण्यात यावे .
9 ) शहरातील टॅक्स पोटी घेतलेले शिक्षणकर , वृक्षकर , पाणीपट्टी यांचे ऑडिट झाले पाहिजे .
10 ) मंगळवेढा नगरीचे वैभव असलेले श्री संत दामाजी पंतांच्या पुतळ्याची वाताहत दिसून येत आहे . सदरील पुतळ्यावरती लवकरात लवकर छत्र बसवण्यात यावे .
12 ) छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचे जुनी भाजी मंडई मधील स्मारकाचे काम धीमईने केले जात आहे , या कामामध्ये दिरंगाई दिसून येत आहे , तरी या स्मारकाचे काम लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावे .
या मागण्याचे निवेदन देण्यात आले तसेच वरील सर्व मागण्यांचा विचार करून त्या पूर्ण करण्याचे आश्वासन मुख्याधिकारी निशिकांत परचंडराव यांनी दिले आहेत .
या आंदोलनात भाजपचे जिल्हा संघटन सरचिटणीस शशिकांत चव्हाण , जिल्हा चिटणीस संतोष मोगल , जिल्हा उपाध्यक्ष औदुंबर वाढदेकर , तालुकाध्यक्ष गौरीशंकर बुरकुल , शहराध्यक्ष गोपाळ भगरे ,माजी नगराध्यक्ष धनंजय खवतोडे , युवा मोर्चा शहराध्यक्ष सुशांत हजारे , नगरसेवक चंद्रकांत पडवळे , नगरसेवकक दीपक माने , आदित्य मुदगुल , नागेश डोंगरे , सत्यजित सुरवसे ,सैफन शेख , सागर ननवरे , बबलू सुतार , सरोज काझी , इन्नूस शेख , कैलास कोळी , हवनाळे , अजित लेंडवे , सुजित निकम , आनंद माने , गणेश चोखंडे , गणेश माळी , विजय चव्हाण , दत्ता पवार कार्यकर्ते उपस्थित होते .