शाळा व्यवस्थापन समिती माजी अध्यक्ष पप्पूशेठ मोरे यांचा स्तुत्य उपक्रम...
मंगळवेढा/प्रतिनिधी :-
ढवळस येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त या शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव शाळा व्यवस्थापन समिती माजी अध्यक्ष, शिक्षणप्रेमी कुटुंब सौ. शुभांगी मोरे , श्री.पप्पूशेठ मोरे यांच्या शुभहस्ते सर्व २७ गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन करण्यात आला आहे.
पप्पूशेठ मोरे यांना सामाजिक कार्याची मनापासून आवड असून, समाजातील सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना शक्य ती मदत करण्याची त्यांची कायम भूमिका राहिली आहे. गरजू, वंचित आणि अडचणीत असलेल्या व्यक्तींच्या मदतीसाठी पुढाकार घेणे, सामाजिक उपक्रमांना सहकार्य करणे आणि समाजहिताच्या कामात सक्रिय सहभाग घेणे, ही त्यांच्या कार्याची वैशिष्ट्ये आहेत.
समाजातील प्रत्येक घटकाचा विकास झाला पाहिजे, प्रत्येकाला आधार मिळाला पाहिजे आणि अडचणीच्या काळात आपल्या माणसांसाठी उभे राहिले पाहिजे, या भावनेतून पप्पू शेठ मोरे सामाजिक बांधिलकी जपत आहेत. ‘समाजासाठी काहीतरी करण्याची जाणीव आणि गरजूंच्या मदतीला धावून जाण्याची वृत्ती’ हीच त्यांच्या सामाजिक कार्याची खरी ओळख म्हणावी लागेल.
गावातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध शैक्षणिक परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश मिळवले आहे. त्यामध्ये इयत्ता ४ थी व ७ वी शिष्यवृत्ती परीक्षा तसेच प्रज्ञाशोध परीक्षा पात्र,NMMS परीक्षेत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
या यशाबद्दल सर्व गुणवंत विद्यार्थी आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशामागे शिक्षकांचे मार्गदर्शन, पालकांचे सहकार्य आणि विद्यार्थ्यांची मेहनत महत्त्वाची ठरली आहे.
मुख्याध्यापक, सर्व शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षण प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.