मंगळवेढा (प्रतिनिधी) :-
तालूक्यातील घरफोडी तसेच मालमत्तेविषयक व इतर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. नागरिकांनी घर बंद करून बाहेर गावी जाताना विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे.सोन्या चांदीचे दागिने,रोख रक्कम तसेच मौल्यवान वस्तू सुरक्षित ठिकाणी ठेवणे गरजेचे आहे. शक्य असल्यास बँकेच्या लॉकरमध्ये अथव विश्वासू नातेवाईकाकडे ठेवाव्यात. तसेच परिसरात संशयित व्यक्ती व हालचाली आढळल्यास कायदा हाती न घेता सदरची माहिती तात्काळ नजीकच्या पोलीस स्टेशनला कळवावी. 'सतर्क नागरिक- सुरक्षित समाज' हा संदेश नागरिकांनी देत पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन मंगळवेढा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरिगीड्डे यांनी केले आहे.
मंगळवेढा शहरातील व तालुक्यामधील विविध गावांमधील नागरिक घरातील कामानिमित्त तसेच धार्मिक सामाजिक अथवा कौटुंबिक कार्यक्रमासाठी घर बंद करून बाहेरगावी जातात. अशावेळी घर बंद असल्याचे संधी साधून चोरी अथवा घरफोडी घडण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी आपल्या घराच्या सुरक्षितेकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.मौल्यवान वस्तू घरात ठेवणे टाळा, तसेच बाहेरगावी जाताना घरातील सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम तसेच इतर मौल्यवान वस्तू सुरक्षित ठिकाणी ठेवा. जर अनेक दिवस घर बंद राहणार असल्यास सदरची माहिती विश्वासू शेजाऱ्यास देण्यात यावी. घराच्या परिसरात संशयास्पद व्यक्ती ची ये - जा करताना आढळल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता तात्काळ संबंधित पोलिस ठाण्यास याबाबत माहिती द्यावी संशयास्पद व्यक्ती आढळल्यास नागरिकांनी स्वतःहून कायदा हाती न घेता सुरक्षित अंतर ठेवून छायाचित्र घेणे अथवा वाहनाची माहिती नोंदवावी व पोलिसांना द्यावी.
तसेच प्रत्येक गावात १५ व्या वित्त आयोगातून येणाऱ्या निधीतून चौका चौकामध्ये सीसी कॅमेरे लावणे बाबत प्रत्येक गावातील नागरिकांनी प्रवृत्त करावे. गावापासून काही अंतरावर असलेल्या वस्तीवर किंवा एकाकी राहणान्या नागरिकांच्या" सूरक्षित बाबत विशेष काळजी घ्यावी. घरफोडी व मालमत्ते विषयक गुन्ह्यापासून बचाव करण्याकरता जनजागृती करण्यात येत आहे.
'सतर्क नागरिक - सूरक्षित समाज' हा संदेश देत नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे. आणि आपल्या परिसरातील संशयास्पद हालचाली बाबत पोलिसांना माहिती द्यावी असे आवाहन मंगळवेढा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांनी केले आहे.