फार्मर मॉल मरवडे शाखेच्या वतीने द्वितीय वर्धापन दिनानिमित्त शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन...
मंगळवेढा/ प्रतिनिधी :-
शेतीपूरक व बांधकामाभिमुख व्यावसायिक कार्यक्षेत्रामध्ये यशकीर्तीच्या उंचीवर असणारा उद्योग समूह म्हणजे फार्मर मॉल बेगमपूर शाखा मरवडे यांच्या वतीने द्वितीय वर्धापन दिनाचे औचित्य साधून सेकंड होम इंग्लिश मीडियम स्कूल मरवडे या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती युवा उद्योजक तथा शाखेचे संचालक सुरज वंदना सूर्यकांत साबळे यांनी दिली आहे.
मागील अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांच्या विश्वासाला पात्र ठरलेल्या फार्मर मॉल या व्यवसायिक समूहाच्या माध्यमातून व उद्योगपती मा. श्री.जनार्धनदादा शिवशरण आणि जिल्हा परिषद सदस्य मा. सौ.करुणाताई शिवशरण यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वाखाली वर्षभर विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व पर्यावरण पूरक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
मरवडे गावातील व परिसरातील आणि पंचक्रोशीतील ग्राहकांनी, हितचिंतक आणि तसेच शेतकरी बंधू-भगिनींनी दाखवलेल्या प्रेमामुळे आणि विश्वासामुळे फार्मर मॉल मरवडे शाखेचा द्वितीय वर्धापन दिन साजरा होत आहे.
जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिक प्रयत्नांची सुंदर अशी गोळा बेरीज करून तसेच ग्राहकांचे हित डोळ्यासमोर ठेवून फार्मर मॉल ने नेहमीच लोकसेवेचा आणि लोकाभिमुख दूरदृष्टीकोन बाळगून आपली व्यावसायिक परंपरा जपली आहे.
दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त सेकंड होम इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शाळा उपयोगी शैक्षणिक साहित्य वाटप करून उज्वल भारत देशाच्या पायाभरणीची एक नवी सुरुवात या कार्यक्रमाच्या माध्यमातून होणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.