मंगळवेढा/ प्रतिनिधी :-
खुपसंगी ग्रामस्थांच्या सहभागातून व पालकांच्या पुढाकारातून खुपसंगी गावात गुणवत्तापूर्ण शिक्षण व मुलांचे सुदृढ आरोग्य यासाठी आपण विशेष प्रयत्न करणार असल्याचे मत जि प सदस्या सौ.करुणाताई शिवशरण यांनी व्यक्त केले.
खुपसंगी ता. मंगळवेढा येथे गावातील पालकांच्या सहभागातून गुणवत्ता पूर्ण शिक्षण व सुदृढ मुलांचे आरोग्य अभियान 202627 चा शुभारंभ व पालक मेळावा यांचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी त्या बोलत होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभियानाचे निमंत्रक कृषिभूषण अंकुश पडवळे यांनी केले.व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष पंचायत समितीच्या सभापती सौ दिपाली ताड, पंचायत समिती सदस्य सर्वश्री विनायक यादव, सौ जयश्री कवचाळे, सौ मोहिनी गणपाटील, गटशिक्षणाधिकारी दर्शन मेहता, वैद्यकीय अधिकारी चंदन रासकर, सरपंच अनुराधा पडवळे उपसरपंच प्रकाश भोसले उपस्थित होते.
पुढे बोलताना शिवशरण म्हणाल्या म्हणाल्या की, शाळांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवणे व मुलांचे आरोग्य सुधारणे यासाठी खुपसंगी गावातील पालकांनी अभियानाच्या माध्यमातून जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे तो अत्यंत स्वागतार्ह आहे. यापुढे पालकांचा शाळेतील सहभाग अत्यंत गरजेचा असून त्यांनी मुलांच्या गुणवत्तेबरोबर आरोग्याकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. सदर अभियानाला जी लागेल ती मदत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून करणार असल्याचे शिवशरण यांनी बोलताना सांगितले.
पंचायत समितीच्या सभापती सौ दिपाली ताड बोलताना म्हणाले की, शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी शिक्षकांनी विविध स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून मुलांना सहभागी करून त्यांच्या कलागुणांना वाव द्यावा व मुलांच्या आरोग्यासाठी विशेष प्रयत्न करावा यासाठी पालकांनी पुढाकार घेणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.
पंचायत समिती सदस्या जयश्री कवचाळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
सदर कार्यक्रमास माजी सरपंच श्रीपती चौगुले, शहाजान पटेल, संभाजी भोसले, आनंदा पडवळे, लहू लवटे, रामा तांबे, प्रकाश माने आरिफ काजी सदाशिव पांढरे अनिल घोडके धनंजय दोलतडे धनाजी सकट अक्षय भोसले, सुनील मरीआईवाले, युवराज सावंत आदी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक भगवान चौगुले, भानुदास चौगुले पांडुरंग वाले बाबुराव माळी गोपाळ लेंडवे मनीषा मोहकर तसलमबी अत्तार यांनी परिश्रम घेतले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री संजय दवले यांनी केले.
चौकट -
खुपसंगी येथील गुणवत्तापूर्ण शिक्षण व सुदृढ मुलांचे आरोग्य अभियान 2026-27 अंतर्गत चांगले काम करणारे शिक्षक, शाळा व मुलांनी पाच फळझाडांची झाडे चांगली वाढवणाऱ्यांना बक्षीसे देण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले.