संघर्षातून समाज परिवर्तन घडविणाऱ्या अभ्यासू महिला नेतृत्व पंचायत समिती सदस्या - जयश्री कवचाळे

संघर्षातून समाज परिवर्तन घडविणाऱ्या अभ्यासू महिला नेतृत्व पंचायत समिती सदस्या - जयश्री कवचाळे

मंगळवेढा/प्रतिनिधी :-

"समाज बदलायचा असेल तर केवळ टीका करून चालत नाही त्यासाठी लोकांच्या अश्रूंना पुसणारे हात, अन्यायाविरुद्ध उभे राहण्याचे धैर्य विकासाची दूरदृष्टी आणि लोकसेवेची अखंड निष्ठा असलेले नेतृत्व आवश्यक असते याची जाण ठेवत तालुक्याचे दमदार नेतृत्व आमदार समाधान दादा अवताडे यांच्या मार्गदर्शनाने, पती संजीव कवचाळे यांच्या सोबतीने व जिल्हा परिषद सदस्य रमेश भांजे यांच्या सहकार्याने बोराळे गणामध्ये हातात ज्ञानाचा दीप, हृदयात समाजसेवेची तळमळ, आणि ग्रामीण भागाच्या विकासासाठी कार्यरत असणाऱ्या पंचायत समिती सदस्या जयश्री कवचाळे यांनी साधेपणा, संवेदनशीलता, प्रामाणिकपणा, अभ्यासवृत्ति, निर्भिडपणा आणि लोकहितासाठी अखंड झटण्याची जिद्द या गुणांनी समृद्ध असलेले त्यांचे व्यक्तिमत्व आज ग्रामीण भागातील हजारो नागरिकांसाठी विश्वास, आशा आणि प्रेरणेचा दीपस्तंभ बनले आहे. 

  ग्रामीण मातीत जन्मलेल्या आणि त्या मातीतल्या प्रत्येक प्रश्नांची भावनिक नाळ जुळलेल्या, गावागावातील वास्तव परिस्थितीची सखोल जाण असणाऱ्या जयश्री कवचाळे यांना शेतकऱ्यांच्या अडचणी, महिलांच्या समस्या, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा, बेरोजगार युवकांच्या अपेक्षा, ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न, दिव्यांग बांधवाचे हक्क आणि सर्वसामान्य कुटुंबाच्या संघर्षाची सखोल जाण आहे. म्हणूनच त्यांचे नेतृत्व हे थेट जनतेपर्यंत पोहोचणारे, लोकांच्या सुखदुःखाशी सहभागी होणारे आणि समस्यांच्या समाधानासाठी कठीबद्ध होणारे नेतृत्व आहे.

  पंचायत समितीच्या सदस्या म्हणून शासनाच्या विविध योजना लाभार्थ्यापर्यंत पोहोचाव्यात सार्वजनिक निधीचा पारदर्शक आणि परिणामकारक वापर व्हावा, प्रशासन अधिक जबाबदार आणि लोकाभिमुख व्हावे तसेच ग्रामीण विकासाला गती मिळावी यासाठी त्या सातत्याने अभ्यासपूर्वक पाठपुरावा करतात त्यांच्या कार्यपद्धतीत केवळ प्रश्न मांडण्याची भूमिका नाही तर त्याचे परिणामकारक निराकरण करण्याची बांधिलकी आहे. 

  समाजकारणात त्याने सेवा हाच धर्म मानला आहे.जात, धर्म,पक्ष, पंथ यांच्या पलीकडे जाऊन प्रत्येक गरजू व्यक्तीच्या पाठीशी उभे राहणे अडचणीच्या काळात मदतीचा हात देणे, सामाजिक ऐक्य जपणे, नागरिकांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देणे आणि न्यायासाठी निर्भीडपणे आवाज उठवणे हे त्यांच्या कार्याचे वैशिष्ट्य आहे. 

  महिला सक्षमीकरणासाठी त्यांनी केलेले कार्य विशेष उल्लेखनीय आहे. महिला बचत गटांना बळकटी देणे, आर्थिक स्वावलंबनाला चालना देणे, महिलांसाठी सहलीचे आयोजन करणे, नेतृत्व विकास, आरोग्य, जनजागृती, कौशल्य विकास, सामाजिक सहभाग आणि महिलांमध्ये सभाधीटपणा व आत्मविश्वास वाढविण्यासाठी त्यांनी सातत्याने आत्तापर्यंत विविध उपक्रम राबविले आहेत. त्यांचा दृढ विश्वास आहे की, महिला सक्षम झाली तर कुटुंब सक्षम होते, कुटुंब सक्षम झाले तर गाव सक्षम होते आणि गाव अधिक सक्षम झाले तर राष्ट्र मजबूत होते.

  अवैध दारू विक्री विरोधातील त्यांचा संघर्ष हा त्यांच्या सामाजिक बांधिलकीचा सर्वोत्तम आदर्श आहे. दारुमुळे उध्वस्त होणारी कुटुंबे, महिलांवरील अत्याचार, मुलांच्या शिक्षणावर होणारा विपरीत परिणाम आणि समाजातील वाढती असुरक्षितता याविरुद्ध त्यांनी निर्भयपणे आवाज उठवला. महिलांना संघटित करणे, व्यापक जनजागृती करणे, प्रशासनाशी सातत्यपूर्ण संवाद साधणे आणि कायदेशीर मार्गाने कारवाईची मागणी करणे या माध्यमातून त्यांनी सामाजिक परिवर्तनाची प्रभावी आवाज उठवत आहेत. 

  शिक्षण क्षेत्राविषयी त्यांना विशेष आत्मीयता आहे. विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता, शिस्त, संस्कार आणि सामाजिक जाणीव निर्माण व्हावी यासाठी त्या सातत्याने प्रयत्नशील असतात. गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव, होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना मदत, शैक्षणिक उपक्रमांना सहकार्य आणि शिक्षणाचा प्रसार हे त्यांच्या कार्याचे महत्त्वपूर्ण पैलू आहेत. त्यांच्या मते शिक्षण हीच समाज परिवर्तनाची सर्वात मोठी शक्ती आहे. 

   सहकार क्षेत्रात त्यांनी पारदर्शकता, लोकसहभाग आणि आर्थिक शिस्त यांना सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करण्यासाठी सहकाराचे महत्त्व त्यांनी कृतीतून अधोरेखित केले असून महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी अनेक विधायक उपक्रमांना चालना दिली आहे.
  साहित्यिक क्षेत्रात ही त्यांनी सामाजिक, शैक्षणिक, प्रेरणादायी आणि वैचारिक लेखनातून स्वतःचा वेगळा ठसा उमटवला आहे. त्यांच्या लेखणीतून समाजप्रबोधन, संस्कार, स्त्री शक्ती, ग्रामीण विकास, लोकसेवा, सकारात्मक विचारसरणी असा प्रभावी संदेश असतो. 

  समाजातील गुणवंत विद्यार्थी, आदर्श शिक्षक, कष्टकरी, शेतकरी, रक्तदाते, सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक, कलाकारअसे विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांचा सन्मान करून त्यांनी समाजात सकारात्मकतेची संस्कृती रुजवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचा ठाम विश्वास आहे की, सन्मान हा केवळ एका व्यक्तीचा नसतो तो समाजातील चांगुलपणाचा उत्सव असतो. चांगल्या कार्याचा सन्मान म्हणजे समाजात आणखी चांगले कार्य घडण्याची प्रेरणा. 

ज्ञान, सेवा, सहकार, साहित्य आणि समाजकारण या पाच मूल्यांचा सुंदर संगम त्यांच्या व्यक्तिमत्त्वात दिसून येतो. अभ्यास पूर्ण नेतृत्व, प्रभावी वक्तृत्व कौशल्य, लोकांशी आत्मीय नाते, विकासाची स्पष्ट दृष्टी आणि समाजासाठी अखंड समर्पण या गुणामुळे त्या केवळ पंचायत समिती सदस्या नसून ग्रामीण विकासाच्या चळवळीतील सक्षम अभ्यासू, दूरदर्शी आणि लोकाभिमुख महिला नेतृत्व म्हणून ओळखल्या जातात. आज त्यांच्या कार्यातून असंख्य महिलांना नेतृत्वाची प्रेरणा, युवकांना समाजसेवेची दिशा, विद्यार्थ्यांना शिक्षणाची नवी उर्मी आणि सर्वसामान्य नागरिकांना न्यायासाठी संघर्ष करण्याचे बळ मिळत आहे.

   त्यांच्या व्यक्तिमत्त्वात ज्ञानाची प्रगल्भता, सेवेची नम्रता, सहकाराची व्यापकता, साहित्याची संवेदनशीलता आणि समाजकारणाची लोकाभिमुखता यांचा विलक्षण समन्वय दिसून येतो त्यामुळे त्या केवळ एक लोकप्रतिनिधी नाहीत तर समाजासाठी प्रेरणा देणारी विचारवंत कार्यकर्ती म्हणून ही ओळखल्या जातात.अशा या कर्तुत्ववान, अभ्यासू, संवेदनशील, धाडसी आणि समाजहितासाठी आयुष्य समर्पित केलेल्या जयश्री कवचाळे यांच्या कार्याचा दीप अधिक तेजाने प्रज्वलित राहो आणि त्यांच्या प्रेरणेने अनेक नवे समाजसेवक घडो हीच मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.