पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा क्षेत्रासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाचे आयोजन...

पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा क्षेत्रासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाचे आयोजन...

मंगळवेढा / प्रतिनिधी :-

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या जयंती निमित्त महसूल विभागाच्या वतीने आमदार समाधान आवताडे यांच्या अध्यक्षतेखाली व तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, उपसभापती व सर्व सदस्य, नगर परिषद नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, तसेच सर्व नगरपरिषद सदस्य, तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधी यांच्या प्रमुख उपस्थितीत पंढरपूर येथे विधानसभा क्षेत्रासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.  
महसूल विभाग अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि गतिमान करण्याच्या उद्देशाने तसेच महसूल विभाग व शासनाच्या इतर सर्व विभागाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या विविध योजनांचा लाभ एकाच छताखाली देण्याच्या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

हे शिबिर रविवार दि. 2 रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत श्रीयश पॅलेस, कराड रोड,पंढरपूर या ठिकाणी पार पडणार आहे. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रांताधिकारी बी.आर.माळी व तहसीलदार मदन जाधव यांनी केले आहे.

महसूल विभागामार्फत 7/12 वाटप, लक्ष्मी मुक्ती योजना, पाणंद रस्ते योजना, सलोखा योजना, जिवंत सातबारा, उत्पन्न जात, अधिवास, नॉन क्रिमीलेअर असे विविध दाखले, नवीन शिधापत्रिका, शिधापत्रिका मध्ये नाव कमी करणे किंवा वाढवणे, संजय गांधी निराधार योजनेच्या वतीने दिल्या जाणाऱ्या विविध योजना, तुकडॆबंदी योजना, अतिक्रमण नियमानुकूल, त्याचबरोबर इतर विभागांच्या वतीने सुद्धा विविध योजनांचा लाभ हा एकाच छताखाली या शिबिराच्या माध्यमातून दिला जाणार आहे.

सदर शिबिरामध्ये पंचायत समिती, नगर परिषद, भूमी अभिलेख, कृषी विभाग, शिक्षण विभाग, महिला व बाल कल्याण, सहायक निबंधक, उपनिबंधक कार्यालय, आरोग्य विभाग या व इतर सर्व विभागांचा सक्रिय सहभाग राहणार आहे. 

तरी या शिबिरामध्ये सहभागी होऊन शासनाच्या विविध योजनांचा लाभ मंगळवेढा तालुक्यातील सर्व नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन प्रांताधिकारी बी.आर.माळी व तहसीलदार मदन जाधव यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.