आमदार समाधान आवताडेंच्या मागणीनुसार उजनीचे पाणी सर्व योजनांना सोडले, जिल्ह्याला दिलासा

आमदार समाधान आवताडेंच्या मागणीनुसार उजनीचे पाणी सर्व योजनांना सोडले, जिल्ह्याला दिलासा 

मंगळवेढा/प्रतिनिधी :-

सध्या सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसाने ओढ दिल्याने पाण्याची टंचाई जाणवत होती त्यातच पुणे परिसरात चांगला पाऊस पडल्यामुळे उजनी धरण प्लस मध्ये आले आहे त्यामुळे आमदार समाधान आवताडे यांनी उजनीचे पाणी विविध योजनांमार्फत दुष्काळी भागात सोडून येथील जनतेला दिलासा देण्याची मागणी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देऊन मागणी केली होती त्या मागणीची दखल घेत सोलापूर जिल्ह्यातील डावा उजवा कालवा, कालव्यासह इतर योजणांना सोडून येथील भागाला सरकारने दिलासा दिला आहे.

 आमदार समाधान आवताडे यांनी केलेल्या मागणीनुसार भीमा सिना जोड कालव्यामध्ये ९०० क्युसेक्स, सीना माढा उपसा सिंचन योजनेसाठी ३०० क्युसेक्स ,उजनी डावा कालव्यासाठी ९०० क्युसेक्स ,उजनी उजवा कालवा २१०० क्युसेक्स ,दहीगाव उपसा सिंचन योजनेसाठी ७० क्युसेक्स ,आषाढी वारीसाठी भीमा नदीत ४००० क्युसेक्स पाणी सोडण्यात आले आहेत.

 सोलापूर जिल्ह्यात अद्यापही पावसाने ओढ दिली असून पेरणी करण्यास अनुकूल स्थिती अद्यापही नाही. त्यामुळे या भागातील शेतकरी पाणी आणि पेरणी या दोन्हीपासून संकटात सापडला आहे. त्यामुळे सध्या सोडलेल्या आवर्तनामुळे शेती पिकांसाठी व पिण्याचा पाण्याचा प्रश्न सध्या तरी सुटला आहे.

-----------------------------------------------------------------

 कृष्णा, पंचगंगा नदीचे पावसामुळे पुराचे अतिरिक्त वाहून जाणारे पाणी म्हैसाळ योजनेच्या वितरिका १ आणि २, तसेच उमदी वितरिका कालव्यात सोडण्याबाबत संबंधितांना आदेश करावे, अशी मागणी आ.आवताडे यांनी केली होती याची दखल घेत म्हैसाळ योजनेतूनही पाणी सोडण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.