मंगळवेढा/ प्रतिनिधी :-
भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रहित, विकास आणि जनसेवेच्या विचारधारेप्रती निष्ठा ही प्रत्येक कार्यकर्त्यांची नैतिकता असल्याचे प्रतिपादन पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघांचे आमदार समाधान आवताडे यांनी व्यक्त केले आहे. पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात मंगळवेढा येथे मतदार संघाचे आमदार समाधाना आवताडे यांच्या अध्यक्षतेखाली व यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये एसआयआर (SIR) अभियान संबंधित आढावा बैठक यशस्वीरीत्या संपन्न झाली. बैठकीच्या प्रारंभी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर विशेष सखोल पुनर्निरीक्षण (SIR) अभियान तसेच 'मन की बात' कार्यक्रमाच्या अनुषंगाने आढावा बैठक घेऊन उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी आ आवताडे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता जनतेपर्यंत पोहोचून संघटन अधिक मजबूत करण्यासाठी आणि अभियान यशस्वी करण्यासाठी पूर्ण क्षमतेने कार्य करेल, असा दृढ संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. आगामी काळातील नियोजनाबाबत पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून त्यांनी महत्त्वपूर्ण सूचना दिल्या.
कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पक्षाची विचारधारा अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविणे आणि समाजहिताचे कार्य अधिक प्रभावीपणे राबविणे, हा या बैठकीचा प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
त्याचबरोबर प्रमुख मार्गदर्शक पश्चिम महाराष्ट्र विभाग समन्वयक योगेश बाचल यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी प्रत्येक पदाधिकाऱ्याने व कार्यकर्त्याने तळागाळात जाऊन कार्य करण्याचे आवाहन केले. केंद्र व राज्य सरकारच्या जनहितकारी योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी समर्पित भावनेने काम करण्याचे त्यांनी सांगितले.
भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रहित, विकास आणि जनसेवेच्या विचारधारेप्रती निष्ठा ठेवत समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचा संकल्प यावेळी अधिक दृढ करण्यात आला. पक्षाच्या माध्यमातून सामान्य नागरिकांच्या समस्या सोडविणे आणि विकासकामांना गती देणे, हेच आमचे अंतिम ध्येय असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
यावेळी यावेळी व्यासपीठावर उपगराध्यक्ष प्रा. येताळा भगत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे चिटणीस, भाजपा तालुकाध्यक्ष अंबादास कुलकर्णी, शहराध्यक्ष नागेश डोंगरे, सभापती दिपाली ताड, माजी नगराध्यक्ष प्रकाश गायकवाड, उपसभापती अर्जुन मल्लाळे, भाजपा महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष आशा पाटील, मंडल अध्यक्ष सिद्धेश्वर कोकरे, मंडल समन्वयक रमेश मोरे आदी सहकारी तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह मंडळ अध्यक्ष, शक्तीकेंद्र प्रमुख, बूथ प्रमुख तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन दिगंबर यादव यांनी केले.