उत्सवाच्या पार्श्वभुमीवर महत्वाच्या दिल्या सुचना...
मंगळवेढा /प्रतिनिधी :-
मंगळवेढा पोलिस ठाण्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळाचे पदाधिकारी, शांतता कमिटीचे पदाधिकारी, पोलिस पाटील आदिंची शांतता कमिटी बैठक घेवून उत्सव दरम्यान नियमांचे पालन करण्याच्या सुचना विभागीय पोलिस अधिकारी डॉ.बसवराज शिवपुजे यांनी यावेळी दिल्या.
मंगळवेढा पोलिस ठाण्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभुमीवर शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली. यामध्ये बोलताना डॉ.शिवपुजे म्हणाले, मिरवणुकीत डी.जे.,डॉल्बी लावू नये. मिरवणुका या वेळेत सुरू कराव्यात व वेळेत समाप्त कराव्यात. संबंधित विभागाची रितसर परवानगी घेण्यात यावी.
पोस्टर, बॅनर, झेंडे, पताके हे वादळी वार्यामुळे फाटून अनुचित प्रकार घडू शकतो. याची दक्षता घ्यावी. कोणतेही आक्षेपार्य पोस्ट सोशल मिडियावर पाठवू नये. असे आक्षेपार्य मेसेज मिळाल्यास तात्काळ कारवाई केली जाईल. आदि सूचना यावेळी बैठकीत देण्यात आल्या.
या बैठकीला पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे, विविध मंडळाचे पदाधिकारी, पोलिस पाटील, पोलिस ठाण्यात सर्व अंमलदार, नगरपालिका विभागाचे स्वच्छता निरीक्षक अनिकेत चंदनशिवे, विज वितरणचे लाइनमन मुढे आदि उपस्थित होते.