मंगळवेढयात मुलींच्या संरक्षणासाठी कार्यान्वित झाले निर्भया पथक;मुलींना काही तक्रारी असल्यास तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन...

मंगळवेढयात मुलींच्या संरक्षणासाठी कार्यान्वित झाले निर्भया पथक...

मुलींना काही तक्रारी असल्यास तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन...

मंगळवेढा /प्रतिनिधी :-

 इंग्लिश स्कूल माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशालेतील मुलींना निर्भया पथकाबाबत महिला पोलिस उपनिरीक्षक डॉ.आरती कणिरे यांनी मार्गदर्शन करून काही अडचणी आल्यास तात्काळ संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.

यावेळी विद्यार्थीनींना निर्भयाची मदत घेण्याविषयी माहिती देवून समुपदेशन करण्यात आले. तसेच सोशल मिडियाचा वापर व गैरवापर याविषयीही समुपदेशन करण्यात आले. शाळेच्या परिसरात पेट्रोलिंग करण्यात आले. 

विद्यार्थीनीशी पोलिस उपनिरीक्षक डॉ.आरती कणिरे यांनी समन्वय साधून काही तक्रारी असल्यास निर्भया पथकाशी संपर्क साधणेबाबत कळवून आपत्कालीन नंबर ११२ बाबत त्यांना माहिती देण्यात आली. शाळेत मुलींच्या तक्रारीसाठी खास निर्भया तक्रार पेटीचा वापर करण्याच्या सुचना देण्यात आल्या. 

यावेळी संत दामाजी महाविद्यालय तसेच न्यु इंग्लिश स्कूल प्रशालेच्या भोवती विनाकारण चकरा मारणार्‍या रोडरोमिओवर बी.पी.अ‍ॅक्ट अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.

 यावेळी पोलिस उपनिरीक्षक डॉ.आरती कणिरे, महिला पोलिस अंमलदार जोंधळे व नकाते आदिनी ही कारवाई केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.