महात्मा बसवेश्वर स्मारक जनजागृतीसाठी बसवन्ना बागेवाडी ते मंगळवेढा बसवज्योत सायकल यात्रेचे आयोजन...(उद्या सकाळी पहाटे जन्मभूमी ते कर्मभूमी १३१ किमी सायकल प्रवास)

महात्मा बसवेश्वर स्मारक जनजागृतीसाठी बसवन्ना बागेवाडी ते मंगळवेढा बसवज्योत सायकल यात्रेचे आयोजन...

(उद्या सकाळी पहाटे जन्मभूमी ते कर्मभूमी १३१ किमी सायकल प्रवास)

मंगळवेढा/प्रतिनिधी :-

सामाजिक समतेचे आद्य प्रवर्तक जगदज्योती महात्मा बसवेश्वरांचे मंगळवेढ्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभा करण्यासंदर्भात नागरिकांची जनजागृती व्हावी यासाठी मंगळवेढेकरांच्या वतीने रविवार दिनांक ५ एप्रिल रोजी बसवन्ना बागेवाडी ते मंगळवेढा बसवज्योत सायकल यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

मंगळवेढा ही बसवेश्वरांची १३ वर्ष कर्मभूमी राहिलेली असुन महात्मा बसवेश्वरांच्या समतावादी,क्रांतिकारी विचारांचे आणि सामाजिक परिवर्तनाचे मंगळवेढा हे मूळ केंद्र आहे,अशा नगरीत महात्मा बसवेश्वरांचे आंतरराष्ट्रीय स्मारक उभा रहावे ही मंगळवेढेकरांची तीव्र इच्छा आहे.

यासाठी बागेवाडी जन्मभूमी ते मंगळवेढा कर्मभूमी असा १३१ किलोमीटर सायकल प्रवास करून स्मारकासाठी आयोजित केलेल्या प्रबोधनपर सप्ताहाचा शुभारंभ करण्यात येणार आहे.

सदर सायकल यात्रेतून बागेवाडी,मनगोळी, विजापूर,अरकेरी, हळळी,उमदी,हुलजंती,मरवडे मंगळवेढा या मार्गावर महात्मा बसवेश्वरांचे विचार तरुणांना कळावेत यासाठी माहितीपर पत्रके देखील वाटण्यात येणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.