आरोग्य व शिक्षण समिती सभापती चेतनसिंह केदार यांचा आरोग्यविभाग कृति समितीतर्फे सत्कार...

आरोग्य व शिक्षण समिती सभापती चेतनसिंह केदार यांचा आरोग्यविभाग कृति समितीतर्फे सत्कार...

मंगळवेढा / प्रतिनिधी :-

सोलापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य व शिक्षण समिती सभापतीपदी चेतनसिंह केदार- सावंत यांची निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्य आरोग्य विभाग कृति समितीतर्फे सत्कार करण्यात आला.

यावेळी कृति समितीचे राज्याध्यक्ष संजय उपरे, राज्यसरचिटणीस चंद्रकांत पवार , राज्यउपाध्यक्ष पांडुरंग कोळी, राज्य प्रवक्ते अशोक कलाल, जिल्हा अध्यक्षा रोहीणी सुगंधी,राज्य सहसचिव शिवाजी येडगे, राज्य कार्याध्यक्ष उमेश पाटील , सांगोला तालुकाअध्यक्ष अविनाश गायकवाड, तसलीमबी अत्तार, जिल्हा संघटक सुनिता येलपले व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी सत्काराला उत्तर देताना केदार सावंत म्हणाले की, मी जिल्यातील आरोग्य कर्मचाऱ्याच्या सर्व प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करेन. सन २०१९ पासूनचा प्रलंबित उत्कृष्ट आरोग्य कर्मचारी पुरस्कार सन २०२२-२३ व २०२३- २४ चा देण्यासाठी पाठपुरावा करून लवकरच हा प्रश्न सोडविण्यात येईल.

त्यासाठी सर्व आरोग्य कर्मचारी , अधिकारी यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात जास्तीत जास्त रुग्ण उपचार घ्यावेत यासाठी प्रयत्न केले जावेत अशी अपेक्षा केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.