मंगळवेढा /प्रतिनिधी :-
भिम प्रतिष्ठान सोलापूर यांच्या वतीने सालाबादप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त भीम प्रतिष्ठान राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा २६ वर्षाची अखंड परंपरा उद्या दिनांक ५/४/२०२६ रोजी सायंकाळी ५:३० वाजता, शिवस्मारक सभागृह, शिंदे चौक सोलापूर येथे आयोजित करण्यात आला आहे.
या वर्षीचा भीम प्रतिष्ठानचा सामाजिक पुरस्कारासाठी पाठखळ गावचे भीमराव बाबुराव मोरे यांच्या सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करून समाजाला आदर्श व प्रेरणादायी दिशा देत आहेत,म्हणून भीम प्रतिष्ठानच्या वतीने सामाजिक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
भीमराव मोरे यांना यापूर्वी कॉलेज जीवनामध्ये नाट्य, वक्तृत्व,तसेच सामाजिक, राजकीय, क्रीडा, क्षेत्रामध्ये तसेच वृत्तपत्रातलेखन क्षेत्रामध्ये यांना यापूर्वी वीस पुरस्कार मिळालेले आहेत दामाजी एक्सप्रेसचा ज़िल्हास्त्रीरीय स्वाभिमानी छावाचा स्तंभ लेखन,रणयुग टाइम्सचा सामाजिक,अहिल्यादेवी होळकर सामाजिक,डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक,अंधश्रद्धा निर्मूलन समिती पुणे यांच्याकडून विशेष कार्याबद्दल,तसेच कुस्ती क्षेत्रात उल्लेखनीय कार्यबद्दल असे या पूर्वी वीस पुरस्कार मिळाले आहेत.