साेलापुर जिल्हा डिजिटल मिडीया पत्रकार संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी मंगळवेढ्याचे पत्रकार शिवाजी पुजारी यांची निवड...

साेलापुर जिल्हा डिजीटल मिडीया पत्रकार संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी मंगळवेढ्याचे पत्रकार शिवाजी पुजारी यांची निवड...

मंगळवेढा /प्रतिनिधी :-

मंगळवेढा येथिल शासकिय विश्राम गृहावर मिडीया पत्रकार संपादक संघटना महाराष्ट्र अध्यक्ष राजा माने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मंगळवेढ्याचे जेष्ठ पत्रकार प्रा.शिवाजी पुजारी यांची साेलापुर जिल्हा डिजीटल मिडीया पत्रकार संघटनेच्या उपाध्यक्षपदी सर्वानुमते निवड करन्यात आली.

अखिल भारतीय डिजिटल मिडिया संपादक आध्यक्ष राजा माने यांनी आजून काही निवडी जाहीर केल्या त्या पुढील प्रमाणे मलिकार्जून देशमुखे, संभाजी नागणे,पाेपट इंगवले,विक्रांत पंडीत,संदिप लिगाडे आदी पत्रकारांची विविध पदावर निवडी या वेळी करन्यात आल्या.

 या निवडी संस्थापक अध्यक्ष राजा माने ,राज्याध्यक्ष सतीश सावंत ,जिल्हाध्यक्ष सचिन कुलकर्णी यांच्या उपस्थितीत पार पडल्या.

 यावेळी बोलताना संस्थापक अध्यक्ष श्री राजा माने म्हणाले
अखिल भारतीय डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना ही देशभरातील डिजिटल माध्यमांमध्ये कार्यरत असलेल्या पत्रकार, संपादक आणि मीडिया प्रतिनिधींचे संघटन असून, या क्षेत्रातील पत्रकारांच्या हक्कांचे संरक्षण, त्यांच्या व्यावसायिक प्रगतीस चालना देणे तसेच डिजिटल माध्यमांची विश्वासार्हता आणि सामाजिक बांधिलकी जपणे हे संघटनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात डिजिटल पत्रकारितेची वाढती भूमिका लक्षात घेता, या माध्यमाला योग्य दिशा देणे आणि समाजहिताच्या चौकटीत कार्यरत ठेवणे ही काळाची गरज बनली आहे असे ते म्हणाले.

 सोलापूर जिल्हाध्यक्ष सचिन कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “डिजिटल मीडिया क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्व घटकांना एकत्रित आणून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी तसेच पत्रकारितेतील नैतिक मूल्ये जपत समाजाप्रती जबाबदारीने काम करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आसल्याचे ते म्हणाले.

 या नियुक्ती वेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सतीश (भाऊ) सावंत,महासचिव विकास भोसले यांच्यासह सोलापूर जिल्हाध्यक्ष सचिन कुलकर्णी, उपाध्यक्ष सचिन दळवे, जिल्हा संघटक सुनील कसबे, सल्लागार अँड. बापुसाहेब मेटकरी तसेच सदस्यपदी नेताजी वाघमारे,सचिन हेंबाडे,कैलास रंनदिवे यांसह अनेक पदाधिकारी व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार संस्थापक अध्यक्ष राजा माने प्रदेशाध्यक्ष सतीश सावंत यांच्या हस्ते करण्यात आला.कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी डिजिटल पत्रकारितेचे वाढते महत्त्व अधोरेखित करताना, या माध्यमातून समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम अधिक प्रभावीपणे करण्याचे आवाहन केले. तसेच संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांना कायदेशीर मार्गदर्शन, प्रशिक्षण, तांत्रिक सहाय्य आणि सामाजिक सुरक्षेच्या दृष्टीने विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.