ढवळस येथे पायोनियर कंपनीच्या वतीने पीक पाहणी व शेतकरी मेळावा संपन्न...

ढवळस येथे पायोनियर कंपनीच्या वतीने पीक पाहणी व शेतकरी मेळावा संपन्न...

मंगळवेढा/प्रतिनिधी :-

मंगळवेढा तालुक्यातील ढवळस येथे पायोनियर सीड्स या कंपनीच्या पी ३३०२ या मका पिकाचा पिक पाहणी कार्यक्रम व शेतकरी मेळावा पार पडला.
 कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुरेश दत्तू मोरे व कलावती सुरेश मोरे यांच्या शुभहस्ते सर्वप्रथम श्रीगुरुदेव दत्ताच्या मूर्तीचे पूजन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
 
कार्यक्रमाच्या दिवशी सर्व शेतकरी बांधव व महिला यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. सुरेश मोरे यांच्या शेतामध्ये मक्याची शेती पीक पाहणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

यासाठी ढवळस गावातील व परिसरातील सर्व शेतकरी बांधवांनी या कार्यक्रमाला उत्सपूर्त प्रतिसाद दिला.

कार्यक्रमास पायोनिअर कंपनीचे अधिकत विक्रेते बंधू पायोनिअर कंपनीचे किशोर पांढरे (ZBM),तुषार साळुंके (TM),अभिजीत चौगुले,मारुती कोळी हे उपस्थित होते. 

तसेच पी ३३०२ या वाणाचे विशिष्ट व मका पिकाचे उत्पन वाढण्यासाठीचे अचूक उपाय व उत्पादन वाढीच्या आधुनिक तंत्रज्ञान याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.