मंगळवेढा/प्रतिनिधी :-
ढवळस गावचे शेतकरी संतोष बावचे यांची माण नदीच्या पात्राच्या कडेला शेताला पाणी पुरवठा करणाऱ्या शेती पंपाच्या विद्युत मोटारीची केबल चोरून नेवून अंदाजे ४ हजार ९०० रुपये नुकसान केल्यामुळे अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी चोरांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
या घटनेची हकिकत अशी की,मी र्फियादी संतोष बावचे जबाब देतो की,मी वरील ठिकाणी कुटुंबासह राहणेस असुन आम्हास सहा एकर शेती असुन ती करुन त्यावर आम्ही कुटुंबाची उपजिवीका भागवितो.आम्हांस पाच एकर शेती असुन त्या शेतीस पाणी देण्याकरिता मान नदीच्या पात्रावर ०५ HPची मोटर बसवलेली आहे. त्या मोटरीपासून सुमारे ३०० फुट अंतरावर इलेक्ट्रीक पोल आहे.त्या पोलवरुन मोटरकरिता केबल वायर टाकुन कनेक्शन नेलेले आहे.साधारण केबल वायर मोटरी पर्यत कनेक्शन नेण्यासाठी १०० मिटर केबल वायर लागत आहे.दि. ३१/०३/२०२६ रोजी सायंकाळी ६:०० वा.चे सुमारास मी माणनदीपात्रावर माझे इलेक्ट्रीक मोटर जवळ गेलो असता मला माझी मोटरची इलेक्ट्रीक वायर दिसली होती त्यानंतर दि.०१/०४/२०२६ रोजी दुपारी २:०० वा.चे सुमारास मी शेतीला पाणी देण्यासाठी शेतात गेलो होतो.
परंतु शेतात गेल्यानंतर मला समजले की, माझी माण नदीपात्रवरील इलेक्ट्रीक मोटर चालु न झाल्याने शेतामध्ये पाणी आले नव्हते त्यामुळे मी इलेक्ट्रीक मोटरीजवळ जावुन पाहणी केली असता तेथे मला मोटरीपासुन केबल वायर कट केलेली दिसली त्यामुळे मी इलेक्ट्रीक पोलजवळ जावुन पाहणी केली असता तेथे ही इलेक्ट्रीक वायर कट केलेली दिसली व इलेक्ट्रीक पोल पासुन इलक्ट्रोक मोटरीपर्यल लागणारी वायर ही कोणी तरी अज्ञात चोरट्याने चोरुन घेवुन गेल्याचे मला खात्री झाली त्यामुळे मी केबल वायरचा आजु बाजुस शोघ घेतला असता परतु माझी चोरुन नेलेली केबल वायर मिळुन आली नाही.
माझे चोरीस गेलेल्या काळया रंगाची चपटी इलेक्ट्रिक केबल सुमारे १०० मीटर लांबीची आतमध्ये तांब्याची तार असलेली सुमारे ४ हजार ९०० रुपये किमतीची इलेक्ट्रिक केबल वायर ही कोणीतरी अज्ञात चोरट्याने माझे संमती वाचून मुद्दाम लबाडीने चोरून नेली आहे, त्यामुळे अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलिस करीत आहेत.