मरवडे येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान अभियान अंतर्गत शिबिरामध्ये 2231 लाभार्थ्यांना एकाच दिवशी देण्यात आला लाभ...
मंगळवेढा / प्रतिनिधी :-
मंगळवेढा अधिकारी व कर्मचारी यांनी लोकाभिमुख प्रशासन करण्यासाठी नोकरीला सेवा समजून कार्य करावे, तरच शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर खऱ्या अर्थाने समाधान येईल व अधिकारी व कर्मचारी यांना सुद्धा काम केल्याचे समाधान मिळेल असे प्रतिपादन आमदार समाधान आवताडे यांनी केले.
ते तहसील कार्यालयाच्या वतीने मरवडे येथे आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत समाधान शिबिर मध्ये अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
तहसील कार्यालय मंगळवेढाच्या वतीने मरवडे येथे तालुक्यातील चौथे शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रदीप खांडेकर, करुणा क्षीरसागर, पंचायत समिती सभापती दीपाली ताड, उपसभापती अर्जुन मल्लाळे, पंचायत समिती सदस्य आप्पासो निकम, मोहिनी गण पाटील, जयश्री कवचाळे, उपविभागीय अधिकारी बी.आर.माळी, उद्योजक आनंद ताड, श्रीकांत गणपाटील, जनार्धन शिवशरण, सुमैया तांबोळी, दादासाहेब पवार, हणमंत दुधाळ, सरपंच मीनाक्षी सूर्यवंशी, सदस्य शिवशरण व इतर लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार मदन जाधव यांनी केले, तर आभार ग्राम महसूल अधिकारी हरीश काटकर यांनी मांडले.
शिबिराला पंचायत समिती, कृषी विभाग, आरोग्य विभाग, भूमी अभिलेख विभाग, पशू संवर्धन विभाग व महिला व बाल कल्याण विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
मरवडे येथील जुनी मुलींची शाळा येथे हे शिबीर घेण्यात आले. या शिबिरामध्ये महसूल विभाग व इतर विभागाचे असे एकूण 25 स्टॉल उभारण्यात आले होते.
तालुक्यातील सर्व मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी एकाच छताखाली महसूल विषयक सेवा देताना दिसून आले तर तहसील कार्यालयातील सर्व शाखांमधील अधिकारी व कर्मचारी यांनी सुद्धा जनतेला तात्काळ सेवा उपलब्ध करून दिल्या.
मंगळवेढा तालुक्यात एकूण 6 शिबीर राबविण्यात येणार असून आज मरवडे व हुलजंती मंडळाच्या वतीने चौथ्या शिबिराचे आयोजन करण्यात आले. यापूर्वी मंगळवेढा, बोराळे, आंधळगाव, मारापूर, पाटखळ या मंडळाच्या वतीने शिबिर यशस्वीरीत्या आयोजित करण्यात आले होते.
आजच्या शिबिरास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत महसूल विषयक व इतर विभागांच्या सेवांचा लाभ घेतला.
आजच्या शिबिरामध्ये महसूल विभागाच्या वतीने सर्वात जास्त म्हणजे 1919 लाभार्थ्यांना लाभ दिला, त्यामध्ये प्रामुख्याने, अभियानांतर्गत आजरोजी निकाली काढण्यात आलेल्या फेरफारांची संख्या - 490, अभियानांतर्गत उपलब्ध करून देण्यात आलेल्या डिजिटल 7/12 उपलब्ध करून दिलेली संख्या - 693, अभियानांतर्गत उपलब्ध करून देण्यात आलेल्या एकूण 8 अ उताऱ्यांची संख्या - 616 अभियानांतर्गत वितरित करण्यात आलेल्या प्रमाणपत्रांची संख्या - 35, अभियानांतर्गत एक खिडकी व्यवस्थेअंतर्गत निकाली काढण्यात आलेल्या अर्जांची संख्या - 01,
त्याचबरोबर संजय गांधी योजनेच्या वतीने 44, पुरवठा विभागाच्या वतीने 23, अभिलेख शाखेच्या वतीने मंडळातील 05 लाभार्थ्यांना शेतकुंडली वाटप, 03 लाभार्थ्यांना जन्म मृत्यू प्रमाणपत्र वाटप, रस्ता आदेश वाटप 02, निवडणूक विभाग मतदार यादीत नाव समाविष्ट करणे 02, महा ई सेवा केंद्र मार्फत 35 असे महसूल विभागाच्या वतीने आज एकूण 1919 नागरिकांना विविध सेवांचा लाभ देण्यात आला.
त्याचबरोबर पंचायत समिती -277, कृषी विभागाच्या -20, आरोग्य विभाग - 55, महिला व बाल विकास विभाग -03, पशुसंवर्धन विभाग -118, भूमी अभिलेख विभाग -03, उमेद अभियान - 25 असे आजच्या शिबिरात एकूण 2231 लाभार्थ्यांना एकाच दिवशी लाभ देण्यात आला.
यानंतर दिनांक 8 मे रोजी भोसे व 15 मे रोजी मंगळवेढा नगर परिषद हद्दीत होणाऱ्या शिबिरांना सुद्धा नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध महसूल विषयक व इतर विभागांच्या सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार मदन जाधव यांनी केले आहे.
आजचे शिबिर यशस्वी होण्यासाठी नायब तहसीलदार शीतल कन्हेरे, निवासी नायब तहसीलदार शिरीष शहापुरे, निवडणूक नायब तहसीलदार जयश्री स्वामी, मंडळ अधिकारी अमरसिंग पंतुवाले, ग्राम महसूल अधिकारी हरीश काटकर, साईनाथ रामोड, प्रतापसिंह घुनावत, सारिका कोंढारे, नंदकुमार भगरे, महसूल सेवक विजय पवार, तानाजी सोनवले, ईराण्णा कांबळे तसेच मरवडे व हुलजंती मंडळातील सर्व ग्राम महसूल अधिकारी, महसूल सेवक, स्वस्त धान्य दुकानदार, पोलीस पाटील, ग्रामपंचायत अधिकारी यांनी विशेष प्रयत्न केले.
या शिबिराला तालुक्यातील इतर सर्व मंडळ अधिकारी, सर्व ग्राम महसूल अधिकारी आवर्जून उपस्थित होते.
चौकट :-
1) आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते आज ई हक्क प्रणालीचे ऑनलाईन लोकार्पण करण्यात आले. ई हक्क प्रणालीच्या माध्यमातून एकूण 10 प्रकारच्या महत्वाच्या सेवा ऑनलाईन स्वरूपात जनतेला उपलब्ध आहेत, त्याची माहिती नागरिकांना देण्यात आली. त्याचे प्रात्यक्षिक ग्राम महसूल अधिकारी साईनाथ रामोड यांनी अत्यंत प्रभावीपणे केले.
2) सदर शिबिर यशस्वी करण्यासाठी पंचायत समिती सदस्य मोहिनी गणपाटील व श्रीकांत गणपाटील यांनी विशेष प्रयत्न केले.