बसवेश्वर स्मारकासाठी जत येथे सुरु असलेल्या आमरण उपोषणास मंगळवेढेकरांचा पाठींबा...

बसवेश्वर स्मारकासाठी जत येथे सुरु असलेल्या आमरण उपोषणास मंगळवेढेकरांचा पाठींबा...


मंगळवेढा/प्रतिनिधी :-

सामाजिक समतेचे आद्य प्रवर्तक,महान संत व विचारवंत जगदज्योती महात्मा बसवेश्वर यांचे मंगळवेढा येथे आंतराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभा करण्यासंदर्भात सांगली जिल्ह्यातील जत येथे सागर कोरे यांनी लिंगायत समाजाच्या वतीने सुरु केलेल्या आमरण उपोषणास समस्त मंगळवेढेकर व बसवप्रेमी नागरिकांच्या वतीने उपोषणस्थळी भेट देऊन पाठींबा पत्र देऊन समर्थन दर्शविण्यात आले. लोकशाहीचे जनक जगदज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांचे कार्य अत्यंत प्रेरणादायी व जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त आहे.त्यांनी दिलेला समता, बंधुता,श्रमसंस्कृती व सामाजिक न्यायाचा संदेश आजही तितकाच महत्त्वाचा आहे.मंगळवेढा ही संत बसवेश्वरांच्या कार्याशी निगडित ऐतिहासिक भूमी असून,येथे त्यांचे राष्ट्रीय दर्जाचे भव्य स्मारक उभारणे अत्यंत आवश्यक आहे यासाठी मंगळवेढेकरांनी नुकतीच प्रबोधन सप्ताहातून जनजागृती केली आहे. 

 त्यातच आता जत येथे बसवेश्वर चौकात पाचव्या दिवशी सुरु असलेल्या उपोषण स्थळी जाऊन स्मारकाच्या मागणीसाठी सैदव आम्ही तुमच्या सोबत आहोत हे मंगळवेढेकरांनी दाखवून दिले आहे.

यावेळी सतिश दत्तू,प्रा विनायक कलुबर्मे,अजय आदाटे,धनाजी घाडगे यांनी उपोषणकर्ते सागर कोरे यांना पाठिंबा पत्र देऊन त्यांच्या आरोग्याची चौकशी केली.

 सदर स्मारकामुळे केवळ ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा जपला जाईल असे नव्हे,तर देशभरातील व परदेशातील पर्यटक,अभ्यासक व भाविक यांना आकर्षित करण्याचे केंद्र म्हणूनही मंगळवेढ्याची ओळख निर्माण होण्यास मदत होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.