मंगळवेढा येथील छत्रपती सभागृहामध्ये रामनवमी उत्साहात साजरी

मंगळवेढा येथील छत्रपती सभागृहामध्ये रामनवमी उत्साहात साजरी 

मंगळवेढा/प्रतिनिधी :-

    मंगळवेढा शहरातील शनिवार पेठ येथील छत्रपती सभागृहामध्ये श्रीराम नवमी उत्सवात साजरी झाली.भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांच्या माध्यमातून रामनवमी उत्साहात साजरी केली जाते . यावर्षी देखील आसावरी महिला भजनी मंडळ , गीत रामायण , प्रभू श्रीराम गीते असे कार्यक्रम करत रामनवमी साजरी करण्यात आली . सकाळी ९:०० वाजले पासून विविध कार्यक्रम घेण्यात आले , दुपारी ठीक १२:०० वाजता फुलांचा कार्यक्रम होऊन कार्यक्रमाचे सांगता करण्यात आली .

   छत्रपती सभागृहामध्ये प्रभू श्रीरामांचे मोठी मूर्ती असून सभागृहाच्या आसपास असणारा परिसर राममय करण्यात आला होता . 
सदर कार्यक्रमास भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण , मंगळवेढा शहराध्यक्ष नागेश डोंगरे , विवेक खिलारे , विश्वास चव्हाण , सुदर्शन यादव , सुशांत हजारे , सतीश दत्तू , दत्तात्रय भोसले , संजय माळी , मोरे सर , अभिजित लोखंडे , विनायक कलुबरर्मे , विजय हजारे , राजवीर हजारे , अविनाश आठवले , सौरभ कनुरे , अजय चव्हाण , तसेच राम भक्त उपस्थित होते .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.