जनता व प्रशासन यांच्यामधला दुवा बनून काम करा- जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण
मंगळवेढा / प्रतिनिधी :-
सोलापूर जिल्हाधिकारी यांच्यामार्फत नवनियुक्त विशेष कार्यकारी अधिकारी यांची नियुक्ती जाहीर करण्यात आलेल्या असून मंगळवेढा तालुक्यातील विशेष कार्यकारी अधिकारी यांचा भारतीय जनता पक्षातर्फे सत्कार करण्यात आला . जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांच्या हस्ते सर्व अधिकारी यांचा सन्मान करण्यात आला .
मंगळवेढा तालुक्यातील एकूण 32 जणांचा यामध्ये समावेश आहे.
मारुती पाटील निंबोणी , सदाशिव केंगार शिवणगी , शिवाजी पटाप हुलजंती , गिरीश पाटील मारोळी , दिलीप वाडेकर मंगळवेढा , नागेश डोंगरे मंगळवेढा , सचिन हेंबाडे ढवळस , अविनाश ढगे निंबोणी , अभिजीत लोखंडे मंगळवेढा , कल्लप्पा वाघमोडे मारोळी , सचिन कांबळे सलगर , जयचंद्र जाधव मंगळवेढा , संतोष मोगले मंगळवेढा , नागेश कस्तुरे दहिवडी , वासुदेव जोशी मंगळवेढा , सिद्धेश्वर कोकरे ब्रह्मपुरी , उमेश विभुते धर्मगाव , महादेव धोत्रे मंगळवेढा , चेन्नवीर लंगोटे बोराळे , कपिल हजारे मंगळवेढा , सुशांत हजारे मंगळवेढा , शामराव आठवले मंगळवेढा , प्रवीण पवार भोसे , येलगोंडा गंगमई येळगी , अशोक भगत मंगळवेढा , बिरुदेव घोगरे निंबोणी , तानाजी जाधव सलगर , महेश खटकाळे आसबेवाडी , किसन जाधव आंधळगाव , परमेश्वर मासाळ गोणेवाडी , प्रभाकर माळी निंबोणी , मारुती भोसले खवे, प्रदीप गायकवाड मंगळवेढा ,अशा नियुक्त झालेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत.
सत्कार केल्यानंतर जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांनी सर्व नूतन विशेष कार्यकारी अधिकारी यांना त्यांच्या जबाबदारी समजून सांगितल्या . भाजप कार्यकर्ते व प्रशासन मिळून काम करत आलेले आहे , समाजातील तळागाळातील जनतेच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवून त्या मार्गी लावण्याचे काम प्रत्येक भाजप कार्यकर्ता करत आलेला आहे.इथून पुढच्या काळात विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त झालेल्या सर्व कार्यकर्त्यांनी देखील आपल्या कर्तव्याची जाणीव लक्षात घेऊन समाजातील सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडवाव्यात . प्रशासन आणि सामान्य जनता यांच्यामधील दुवा बनून आपण काम करावं .आपली जबाबदारी समजून घ्यावी अशा पद्धतीचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
सदरील सत्कार करताना जिल्हा सरचिटणीस संतोष मोगले , शहराध्यक्ष नागेश डोंगरे , युवा मोर्चा मा.जिल्हाध्यक्ष सुदर्शन यादव , बादल सिंह ठाकुर व नवनियुक्त विशेष कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.